भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. समाज माध्यमांवर तर मोदींची लोकप्रियता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोदी हे समाज माध्यमांच्या नियमित आणि प्रभावी वापरासाठी प्रसिद्ध आहेत. नुकताच मोदी यांनी आपला एक फोटो समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. मोदींच्या या फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. तर मोदींच्या या फोटोमुळे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आठवण नेटकरी काढताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेत दाखल झाले आहेत. काही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय बैठकांच्या निमित्ताने मोदींचा हा अमेरिका दौरा होत आहे. बुधवार, २२ सप्टेंबर रोजी मोदी या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. तर त्याच दिवशी मोदींनी एक फोटो समाज माध्यमांवर अपलोड केला. या फोटोत नरेंद्र मोदी हे विमान प्रवासातही काम करताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना मोदींनी म्हटले आहे की “लांब पल्ल्याचा विमान प्रवास म्हणजे काही कागदपत्रे आणि फाईल्स पाहण्याची संधी”
A long flight also means opportunities to go through papers and some file work. pic.twitter.com/nYoSjO6gIB
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2021
हे ही वाचा:
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?
डोंबिवली हादरले! अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार
बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी
नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार
मोदींचा हा फोटो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. मोदींच्या या कर्तव्यदक्ष स्वभावासाठी त्यांच्यावर होत आहे. तर या फोटोवरून अनेक नेटकऱ्यांना भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आठवण झाली आहे. शास्त्री हे देखील विमान प्रवासात फाईल्स तपासण्याचे काम करत असत. त्यांचा तसा एक फोटोही उपलब्ध आहे. शास्त्री यांचा हा फोटो देखील समाज माध्यमांवर सर्वत्र व्हायरल झाला आहे.