भारताच्या लष्करला बळ देणाऱ्या तसेच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणाऱ्या अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे इंटर कॉन्टिनेन्टल न्युक्लिअर मिसाईलची आज पहिल्यांदा युजर ट्रायल होणार आहे. ओडिशाच्या बालाकोट या ठिकाणावरुन ही चाचणी होणार आहे. या आधी अग्नी ५ या मिसाईलचे सात वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मल्टिपल टार्गेट पद्धतीने परीक्षण करण्यात येणार आहे.
अग्नी ५ हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल आहे. याची निर्मिती डीआरडीओने केली आहे. भारताने या मिसाईलच्या निर्मितीची सुरुवात २००८ साली केली होती. त्यानंतर आतापर्यंत याची सात वेळा परीक्षण घेण्यात आलं आहे. या मिसाईलच्या माध्यमातून न्युक्लियर वेपन्स कॅरी करता येऊ शकतात. हे मिसाईल सहजपणे वाहून नेता येऊ शकतं.
अग्नि -५ क्षेपणास्त्र ६००० किमी लांबीवर अचूक मारा करू शकते का? हे या चाचणीतून कळणार आहे. यातून सरकार संरक्षणावर नव्याने भर देईल आणि पुढील विकासाचे नियोजन करेल. आजच्या या चाचणीकडे भारतीयांबरोबरच पद्धतशीर प्रतिस्पर्धी आणि शेजारी पाकिस्तान आणि चीनसुद्धा डोळे लावून बसले आहेत.
हे ही वाचा:
नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार
परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स
जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!
…म्हणून जम्मू-काश्मीरमधील सहा कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ
अग्नी ५ या मिसाईलचा वेग हा २४ मॅक इतका असून तो आवाजाच्या वेगाच्या २४ पट हा वेग असल्याचं सांगितलं जातं. अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा पल्ला हा पाच हजार किलोमीटर इतका आहे. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील अनेक देश या मिसाईलच्या टप्प्यात येणार असल्याने भारताच्या लष्करी शक्तीत चांगलीच वाढ झाली आहे. बंगालच्या खाडीमध्ये बालासोर या ठिकाणी अग्नी ५ चे परीक्षण करण्यात येणार असल्याने या भागातील सर्व विमानांच्या वाहतूकीवर बंदी आणण्यात आली आहे.