शिवसेना नेते अनंत गिते यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानंतर खळबळ उडाली आहे. श्रीवर्धन येथील भाषणादरम्यान ते म्हणाले की, दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेसी विचारांची कदापी होऊ शकणार नाही.
त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे राजकीय आत्महत्या आहे, ही युती नकोच.
सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, आज एक संजय राऊतांचा अपवाद जर सोडला तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात.
मुनगंटीवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. पण अनंत गिते हृदयापासून बोलत होते. अशा शिवसेनेसाठी मी आयुष्याचा कण आणि कण वेचला नाही असं त्यांनी सांगितलं असतं.
हे ही वाचा:
धक्कादायक! कुंद्रा विकणार होता पॉर्न व्हीडिओ ९ कोटींना
अ.भा.आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरींच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार
आता इंग्लंडलाही पाकिस्तान नकोसा!
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळ्यात गिते यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका केली. या दोन पक्षांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत मग शिवसेना काँग्रसेच्या विचारांची कशी होईल. ते पुढे म्हणाले की, राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे.