नॅशनल कौंसिल ऑफ एज्युकेशनल अँड ट्रेनिंगच्या (एनसीईआरटी) पुस्तकात औरंगजेब आणि शहजहान यांना ओढूनताणून ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी १२वी च्या पुस्तकात तथ्यहीन माहिती छापण्यात आली आहे. माहिती अधिकारा अंतर्गत केलेल्या अर्जातून ही माहिती समोर आली आहे.
एनसीईआरटीच्या थिम्स ऑफ इंडियन हिस्टरी (भाग २) या १२वी च्या पुस्तकातील पान क्रमांक २३४ वर छापलेल्या उताऱ्या नुसार “आपल्याला औरंगजेब आणि शहाजहान यांच्या कारकिर्दीतून असे समजते, जेव्हा युद्धात मंदिरे उध्वस्त व्हायची तेव्हा कालांतराने त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीही दिला जात असे.” या उताऱ्याचा पुरावा माहिती अधिकारा अंतर्गत शिवांक वर्मा यांनी मागीतला होता. या सोबतच वर्मा यांनी औरंगजेब आणि शहाजहान यांनी दुरुस्त केलेल्या मंदिरांची यादीही मागितली होती. या अर्जाला उत्तर देताना अशी कोणतीही माहिती नसल्याचे एनसीईआरटीने म्हटले आहे.
एनसीईआरटी च्या या उत्तरामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कुठलेही पुरावे नसताना एनसीईआरटी तथ्यहीन इतिहास कसा छापते असा सवाल केला जात आहे.
RTI: NCERT says it has no information on sources for its textbook's claim that Aurangzeb and Shah Jahan gave grants to repair Hindu Temples which were destroyed during war.
When no info is available, why did NCERT publish it in its textbook? pic.twitter.com/WHXoV1IbQs
— Anshul Saxena (@AskAnshul) January 14, 2021