24.3 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाअफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात

अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात

Google News Follow

Related

गुजरातमधून तब्बल ९ हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आले आहे. हे हेरॉइन अफगाणिस्तानातून आणले गेल्याचे कळते. कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआयनं झडती घेतली त्यात ही हेरॉईन सापडले. आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. यासंदर्भात काही अफगाण नागरीकांचाही शोध घेतला जातोय, ज्यांचं ह्या जप्त केलेल्या हेरॉईनशी संबंध आहे.

गुजरातमध्ये डीआरआयला जी हेरोईन सापडलीय ती जवळपास ९ हजार कोटी रुपये किंमतीची असल्याची माहिती पुढं आलीय. ह्या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी इथं छापे टाकून चौकशी केली जातेय. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलीय आणि काही अफगाण नागरीकांचा शोध सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार- ही जगातली आतापर्यंतची जप्त केलेला सर्वात मोठी हेरॉईनचा साठा आहे.

जप्त केलेल्या हेरोईनचा आंध्र प्रदेशाशी धागेदोरे जुळून आलेले आहेत. आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडींग नावाची कंपनी आहे. ह्या कंपनीनं अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टीप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचं टीप देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याच टीपच्या आधारावर मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱ्यांनी घेतली. अधिकाऱ्यांना कंटेनरमध्ये ड्रग्जसारखी पावडर मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, ती पावडर टॅलकम पावडर असल्याचं सांगितलं गेलं.

हे ही वाचा:

शाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली

‘हिशेब चुकते करण्यासाठी पोलिसांचा वापर केल्याचे हे परिणाम’

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

मशिदीतून पाणी प्यायल्यामुळे पाकिस्तानात हिंदू कुटुंबाला ठेवले कोंडून

घटनास्थळावर गांधीनगरचे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक तज्ज्ञ) हजर होते. त्यांनी ती पावडर तपासली. त्यानंतर त्यामध्ये हेरॉईन असल्याची खात्री केली. अगदी तंतोतंत सांगायचं तर पहिल्या कंटेनरमध्ये १९९९.५८ किलो ग्रॅम हेरोईन होती तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ९८८.६४ किलो ग्राम म्हणजेच २ हजार ९८८.२२ किलो ग्राम एवढी हेरोईन जप्त करण्यात आलीय. हे कंटेनर अफगाणिस्तानमधून जरी आले असले तरीसुद्धा ते इराणच्या बंदर अब्बास पोर्टमधून आलेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा