25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणकम्युनिस्टांनाही कळले, कट्टर इस्लामी संघटना करत आहेत शिक्षित महिलांना लक्ष्य!

कम्युनिस्टांनाही कळले, कट्टर इस्लामी संघटना करत आहेत शिक्षित महिलांना लक्ष्य!

Google News Follow

Related

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) लीक झालेल्या आपल्या पत्रकात केरळमधील कट्टरपंथी इस्लामिक संघटनांकडून व्यावसायिक महाविद्यालयांमधील तरुण सुशिक्षित महिलांना दहशतवादाकडे ओढून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा दिला आहे. असे प्रयत्न होत असल्याबद्दल सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठविला आहे.

सीपीआयने (एम) १६ सप्टेंबर रोजी ‘अल्पसंख्याक सांप्रदायिकता’ या नावाने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पत्रके वाटली, ज्यात वरील शीर्षकाखाली राज्यात जातीय विघटन निर्माण करण्यासाठी अतिरेकी संघटनांनी मुख्य प्रवाहातील मुस्लिम संघटनांमध्ये घुसखोरी केली आहे, असे लिहिले आहे. त्यामुळेच केरळमध्ये तालिबानवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, सीपीआयने (एम) आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना या मुद्द्यांवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

केरळच्या सत्ताधारी पक्षाच्या मते, जातीयवाद आणि अतिरेकी विचारसरणीच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे व्यावसायिक महाविद्यालयांतील सुशिक्षित मुलींना जागृत केले जात आहे. सीपीआय (एम) च्या विद्यार्थी संघटना आणि युवा संघटनेने या विषयावर विशेष लक्ष दिले पाहिजे. कॅथलिक बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी लावलेल्या लव जिहाद आणि मादक पदार्थांच्या जिहादच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

बाप्पाच्या विसर्जनासाठी गेलेले पाच बुडाले! दोघांना वाचविले

बाप्पाला निरोप देण्यासाठी बर्लिनमध्येही वाजले ढोल ताशे

विद्यापीठाला नाव देण्यात आलेले राजा महेंद्र प्रताप सिंह कोण आहेत? वाचा सविस्तर

‘टेटेपटू मनिका बात्राला का वगळले त्याची कारणे द्या!’

दरम्यानच्या काळात भाजपने सीपीआयवर (एम) दहशतवाद्यांना भरभराटीसाठी सुपीक जमीन उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कुम्मनम राजशेखरन म्हणतात की जर अतिरेक्यांविरोधात योग्य प्रतिसाद मिळाला असता, तर त्यांनी राज्यात पाय रोवला नसता. आता हे सरकार किती प्रामाणिकपणे म्हणत आहे की, दहशतवादाविरोधात दक्षता वाढवली पाहिजे?

सीपीआयने (एम) केरळ राज्यात लव जिहाद किंवा ग्रूमिंग जिहाद प्रचलित आहे, हे जाहीरपणे मान्य केले पाहिजे, कारण आता पक्षाने तयार केलेल्या पत्रकात त्याचा उल्लेख आहे. सीपीआयने या मुद्द्यावरील दुटप्पीपणा संपवावा. या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. राज्यात दहशतवाद्यांचा प्रभाव वाढत आहे आणि ते लव्ह जिहादचा वापर करून आपले ध्येय साध्य करत आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा