23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आणि ते म्हणाले की, असे लोक लष्कराला पुरवलेल्या या सुविधांवर मौन बाळगतात, कारण त्यांना कल्पना आहे की त्यांचा खोटेपणा बाहेर येऊ शकतो. काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनी या प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केले होते आणि ते अनावश्यक असल्याचे म्हटले होते.

दोन संरक्षण कार्यालय इमारतींचे काम पूर्ण होणे हे देशाच्या आधुनिक संरक्षक संरचनेच्या दिशेने उचलेले मोठे पाऊल आहे. लष्करी कामांना मोदी सरकार नेहमीच प्राधान्य देत असते, असेही ते म्हणाले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आर्किटेक्ट्स आणि अभियंत्यांनी तयार केलेल्या दोन संरक्षण कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम हे १२ महिन्यात पूर्ण झाले असून या इमारती सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानसारख्या “फेल्ड स्टेट” कडून धड्यांची गरज नाही

२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?

स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे, नेहरूच होते माफीवीर!

भूपेंद्र पटेल सरकारमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी

आज, जेव्हा केंद्र सरकार भारताचे लष्करी सामर्थ्य प्रत्येक बाबतीत आधुनिक बनवण्यात, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्यात, लष्कराला लागणाऱ्या उपकरणांच्या खरेदीला गती देत ​​आहे, तेव्हा देशाच्या संरक्षणाशी संबंधित कार्यालयातील काम सुद्धा आधुनिक पद्धतीने होणे गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाचा कारभार हाती घेतला तेव्हा खासदारांसाठी चांगल्या सुविधा आणि कार्यालय असावे अशी गरज जाणवली. मात्र, ज्या सैनिकांनी देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्याच्या कामाला प्राधान्य दिले गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा