24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरअर्थजगतमोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांवरील संकट दूर होणार

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांवरील संकट दूर होणार

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसांठी पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राकडून पॅकेज मंजूर झाल्याचं कळताच टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. सर्वाधिक शेअर्स भारती एअरटेलचे वाढले आहेत. काही वेळापूर्वी भारती एअरटेलचा शेअर ७३२.८० रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर गेल्या पाच दिवसात एअरटेलचा शेअर्स ४५ रुपयांनी वाढला आहे. केंद्राच्या पॅकेजचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला झाल्याचं दिसून आलं आहे. दुपारी एक पर्यंत व्होडाफोनचा शेअर ९ रुपये ३० पैशांनी वधारला. तर, गेल्या एक महिन्यात व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये ५०.४२ टक्के तेजी आली आहे.

बीएसएनल आणि एमटीएनला देखील केंद्र सरकार दिलासा देऊ शकतं. बीएसएनल आणि एमटीएनल वरील कर्ज इक्विटीमध्ये बदलण्यास केंद्र सरकार मंजुरी देऊ शकतं अशी माहिती आहे. आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलंम बिर्ला यांनी जून २०२१ रोजी कर्जात बुडालेली व्होडाफोन आयडिया कंपनीतील हिस्सा सरकारकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय व्होडाफोन आयडिया कंपनीचा काही हिस्सा वित्तीय संस्थेकडे सोपवण्याची तयारी करण्यात आली होती. ब्रिटनच्या व्होडाफोन कंपनीनं भारतातील बिर्ला ग्रुपसोबत एकत्रित येऊन व्होडफोन आयडिया लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली होती.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका

कोरोनाची जन्मभूमी चीनमध्येच पुन्हा कोरोनाचे थैमान

आयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

ब्रिटनची व्होडाफोन आणि भारतातील बिर्ला ग्रुपच्या आयडिया कंपनीनं एकत्र येत व्होडाफोन आयडिया कंपनी स्थापन केली होती. या कंपनीला विविध वैधानिक कामांसाठी सरकारचे ५०,४०० कोटी रुपये द्यायचे आहेत. मात्र, व्होडाफोन आयडिया कंपनीची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीवर १ लाख ८० हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. यामध्ये सुमारे ९६,२७० कोटी रुपये स्पेक्ट्रम शुल्काचे आहेत. बँकांची थकबाकी २३ हजार कोटींच्या जवळपास आहे आणि एजीआरची थकबाकी ५८,२५४ कोटी आहे. कंपनीने एजीआर थकबाकीमध्ये आतापर्यंत फक्त ७,८५४ कोटी भरले आहेत. तरीही कंपनीला ५० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करायची आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा