26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमेरे अपने चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण

मेरे अपने चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण

Google News Follow

Related

आजच्या ग्लोबल युगातील सोशल मिडियात काही जुने संदर्भ सापडतात. असाच एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे गुलजार दिग्दर्शित ‘मेरे अपने ‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनास १० सप्टेंबर रोजी यशस्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. असे एक दोन ट्वीट हे पटकन बातमी आणि काही जणांसाठी लेखाचे निमित्त ठरले. अनेकानी गुलजार यांना फोन करुन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. त्यांना मात्र आपल्या दिग्दर्शनातील हा पहिला चित्रपट खरंच १० सप्टेंबर १९७१ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला याची खात्री नव्हती. म्हणून त्यांनी निर्माता राज एन. सिप्पीना फोन केला, त्यालाही याबाबत साशंकता होती. यू ट्यूबवर ‘मेरे अपने ‘चे सेन्सॉर प्रमाणपत्र पाहिले असता त्यावर ९ नोव्हेंबर १९७१ अशी तारीख आहे. म्हणजे या चित्रपटाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत हे अशा तपशीलासह खरेच आहे. पण मुंबई आणि बिहारमध्ये हा चित्रपट १९७२ च्या जानेवारीत प्रदर्शित झाला. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. म्हणजे, या शुक्रवारी दिल्ली आणि पंजाब असेल तर पुढील शुक्रवारी अन्य राज्यात तो चित्रपट प्रदर्शित होई. असो. एव्हाना ‘मेरे अपने ‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली याची मिडियात मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली. सहज म्हणून सांगायला हवे, गुलजार आजही लॅन्ड लाईन फोनचा वापर करतात, अजूनही ते मोबाईल वापरत नाहीत.

‘मेरे अपने ‘ या चित्रपटात मीनाकुमारी, विनोद खन्ना, शत्रूघ्न सिन्हा, सुमीता सन्याल, योगिता बाली, रमेश देव, असरानी, पेंटल, असित सेन, लीला मिश्रा, अभी भट्टाचार्य, देवेन वर्मा, केश्तो मुखर्जी, दिनेश ठाकूर, मास्टर चिंटू आणि डॅनी डेन्झोपा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा संवाद आणि गीते गुलजार यांची असून संगीत सलिल चौधरी यांचे आहे. या चित्रपटातील कोई होता जिसको अपना, हालचाल ठीक ठाक है ही गाणी आजही लोकप्रिय आहेत हे विशेष. या चित्रपटाचे छायाचित्रण के. वैकुंठ यांचे आहे तर संकलन वामन गुरु यांचे आहे. हा चित्रपट एका बंगाली चित्रपटावर बेतला आहे. युवकांच्या दोन टोळ्यांतील वैर आणि त्याची परिणती दुर्दैवाने एका वृध्देच्या मृत्यूत असे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र आहे. नाट्यपूर्ण मांडणीमुळे हा चित्रपट अधिकाधिक रंगतदार ठरला.

‘मेरे अपने ‘ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शनात गुलजार यानी समिक्षक आणि रसिकांची संवेदनशील दिग्दर्शक म्हणून दाद मिळवली. तोपर्यंत गुलजार हे प्रामुख्याने गीत लेखक म्हणून ओळखले जात होते. दिग्दर्शक म्हणून गुलजार यांनी कोशिश, परिचय, अचानक, खुशबू, किनारा, किताब, आंधी, मौसम,अंगूर, इजाजत, लेकिन इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन करताना केवढी तरी विविधता दिली हे अधोरेखित होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा