26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलींचा पाच लाखात सौदा करणारा जेरबंद ...

अल्पवयीन मुलींचा पाच लाखात सौदा करणारा जेरबंद …

Google News Follow

Related

मुंबईत बोरिवली येथे दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या वेश्यादलालास अटक करण्यात आली आहे. या दोन्ही अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.

१३ सप्टेंबरला ही घटना घडली. या इसमाला जेरबंद करण्यासाठी सापळा रचण्यात आला. बोगस गिऱ्हाईकाच्या रूपात या इसमाकडे विचारणा करण्यात आली. त्यानुसार तो बोरिवली पूर्व येथील राजूज किचन हॉटेल येथे दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी घेऊन आला. अशा मुलींचा पुरवठा करून त्यावर उपजीविका करणारा हा इसम होता. प्रत्येकी ५ लाखाला तो या मुलींची विक्री करणार होता. पण खबऱ्यांमार्फत त्याच्या या हालचालीची माहिती मिळाली. त्यानंतर मग सापळा रचण्यात आला आणि बोगस गिऱ्हाईकाच्या रूपात या इसमाला बोलावण्यात आले. बोरिवलीत हा इसम या मुलींना घेऊन आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्या मुलींची सुटका करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

महिलांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई पोलिसांची निर्भया पथके

फोर्ड बंद होऊन देखील कर्मचाऱ्यांना ‘असा’ मिळणार दिलासा

अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

सदर आरोपी २८ वर्षांचा असून त्याचे नाव नितेश उर्फ राज नवीन सिंग आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे करत आहे. ही यशस्वी कामगिरी पोलिस सहआयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त वीरेश प्रभू, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे, प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तावडे,पो. नि, विलास भोसले, सचिन गवस, अतुल डहाके, स.पो.नि. बाळासाहेब कानवडे, विजय रासकर, हवालदार अल्ताफ खान, लिम्हण, सावंत, शैलेश बिचकर, अमोल राणे, मोरे यांनी पार पाडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा