26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषलवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

Google News Follow

Related

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत ही लवकरच आपल्याला एका नव्या अवतारात दिसणार आहे. कंगना लवकरच सीता मैय्याची भूमिका साकारताना दिसेल. मंगळवार १४ सप्टेंबर रोजी कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून यासंबंधीची घोषणा केली आहे.

रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये ही कायमच भारताची ओळख राहिली आहेत. या महाकाव्यातील कथा आणि व्यक्तिरेखा कायमच सर्वांसाठी आकर्षणाचा विषय राहिले आहेत. आजही या विषयांना लोकांची तेवढीच पसंती लाभताना दिसते. त्यामुळे कला क्षेत्रातही अनेकदा या कलाकृती वेगवेगळ्या प्रकारे साकारलेल्या पाहायला मिळतात.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात पोलिस तक्रार! रश्मी ठाकरे, संजय राऊतांचेही नाव

ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक

एकीकडे ओम राऊत यांचा आदी पुरुष हा रामायणावर आधारित चित्रपट येऊ घातलेला असतानाच आता माँ सीता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नवा चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. कंगना रनावत या चित्रपटात सीतेची भूमिका साकारताना दिसेल. अलौकिक देसाई हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अलौकिक देसाई आणि के.विजयेंद्र यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर चित्रपटातील गाणी आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंताशिर यांचे आहेत. ह्युमन बिंग स्टुडिओ या संस्थेची निर्मिती असणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू मल्याळम, आणि कन्नड या पाच भाषांत प्रदर्शित केला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा