26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान

सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान

Google News Follow

Related

आता राज्यातील सहा जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ ऑक्टोबरला होणार आहेत. निवडणुक आयोगाने नुकतीच ही तारीख जाहीर केली. मतदानानंतर ६ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होईल. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडून कोरोना रुग्णांची संख्या, आठवडाभरातील दैनंदिन आणि मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले.

इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही, तो अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. राज्य सरकार आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार तर ६ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

हे ही वाचा:

पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यालाही आता मिळेल घर?

नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे ते करत होते बेकायदेशीर ‘पीडीएफ’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

धुळे, नंदुरबारसह नागपूर, वाशिम, अकोला या जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीतील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका रद्द करून तेथे नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते. राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे म्हणून राज्यात आंदोलन झाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडण्यात आला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यावर एकमत झाले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाला कोरोनाचे कारण देत स्थगित केलेला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करावा लागला आहे.

पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २१ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा