24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषभारत-इंग्लंड पाचवी कसोटी अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलली

भारत-इंग्लंड पाचवी कसोटी अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलली

Google News Follow

Related

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानचा अंतिम कसोटी सामना अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट महामंडळ आणि इंग्लंड क्रिकेट महामंडळे यांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षण चमूमध्ये आढळून आलेल्या कोविड रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार, १० सप्टेंबर पासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सुरु होणार होता. कालपासूनच या कसोटी सामन्यावर संकटाचे ढग डाटले होते. हा सामना खेळला जाणार, पुढे ढकलला जाणार की रद्द केला जाणार? याबाबत कोणतीच निश्चितता नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाचे फिजिओ असलेले योगेश परमार हे कोविड पॉझिटिव्ह आढळले. म्हणूनच या सामन्यावर संकट ओढवल्यासारखे वाटत होते. कारण परमार हे कोविड पॉझिटिव येण्याआधी सतत भारतीय संघातील खेळाडूंच्या संपर्कात होते.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

तर त्या आधी मालिकेतील चौथी कसोटी सुरू असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे अशा परिस्थितीत संघातील खेळाडूंच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून हा सामना अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ही कसोटी माविकेचा विजेता कोण? हे पाचव्या सामन्याच्या निकालानंतरच ठरवले जाईल.

सुरुवातीला इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून या संदर्भातील घोषणा बाहेर आली. त्यामुळे भारताने पाचव्या कसोटी सामन्यावर पाणी सोडण्याचे म्हटले गेले होते. भारताने सामना दान दिला असे इंग्लंड क्रिकेट संघाकडून सांगण्यात येत होते. तर दुसरीकडे भारतीय संघ किंवा क्रिकेट महामंडळ यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत नव्हत्या. पण नंतर इंग्लंड मंडळाने आपले शब्द मागे घेतले असून हा सामना अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा