27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषजागा हडप करण्यासाठी वाजवले जातात फटाके...

जागा हडप करण्यासाठी वाजवले जातात फटाके…

Google News Follow

Related

उरणमधील पांजे ही नैसर्गिक पाणथळ जागा असून ही जागा नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची तक्रार केली जात असतानाच आता नवीन प्रकरण समोर येत आहे. पांजे येथे भरतीचे पाणी अडवले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. मात्र, आता या पाणथळ जागेत भर दिवसा पक्ष्यांना घाबरवण्यासाठी फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या जागेतील घडत असलेल्या विविध प्रकारांबद्दल तक्रार करूनही त्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नैसर्गिक पाणथळ जागा नष्ट करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जात असल्याची तक्रार येथील नैसर्गिक अधिवासासाठी लढणारे कार्यकर्ते २०१८ पासून करत आहेत. मात्र त्याचा प्रत्यक्ष पुरावा मंगळवारी फटाके फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मिळाला आहे. व्हिडीओ मुख्यमंत्री कार्यालयातही पाठवण्यात आला आहे.

पांजे, पुंजे, बोडकवीरा आणि डोंगरी हे भाग पाणी साचण्याच्या नैसर्गिक जागा आहेत. यातील काही जागा एसईझेडमध्ये समाविष्ट करण्यासाठी करार करण्यात आला होता. या भागात दरवर्षी दीड ते दोन लाख स्थलांतरित पक्षी येत असतात त्यामुळे ही जागा पर्यावरणदृष्टीने संवेदनशील आहे. या भागात अनेकदा फटाके वाजवून पक्ष्यांना घाबरवण्यात येते, अशी माहिती पांजे प्रकरणातील याचिकाकर्ते नंदकुमार पवार यांनी दिली. खारफुटीचा परिसर, पाणथळ जागा हळूहळू सुकवत न्यायच्या म्हणजे पक्ष्यांचे येणे कमी होईल. फटाके वाजवून पक्ष्यांना घाबरवायचे म्हणजे पक्षी त्या जागी येणारच नाहीत. नंतर सुकलेल्या जागेवर भराव घालून त्या जागा बिल्डरांना उपलब्ध करून देण्याचा डाव आहे, असेही पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’

बायकोच्या त्रासामुळे त्याचे २० किलो वजन घटले!

उरणमध्ये ही भराव कामे होण्यापूर्वी पूराचा धोका नव्हता; मात्र भराव कामाला सुरुवात झाल्यापासून उरणमधील २९ पैकी २० गावांना पूराचा धोका निर्माण होऊ लागला आहे, असे स्थानिक सांगतात. पांजे ही पाणथळ जागाही नष्ट झाली तर ग्रामस्थांना येत्या काही काळात भीषण समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पर्यावरण प्रेमी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा