26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट

आता घरबसल्या काढता येणार बसचे तिकीट

Google News Follow

Related

‘बेस्ट’ बसने प्रवास करताना लागणारे तिकीट आता प्रवासी घरबसल्या काढू शकणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत घरबसल्या तिकीट काढता येऊ शकणारे नवीन मोबाईल अ‍ॅप येण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यानची गर्दी आणि सुट्या पैशांवरून वाहकांसोबत होणारे वाद टाळण्यासाठी प्रवाशांना ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल. बेस्ट उपक्रमाकडून ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ सुविधाही सुरू करण्याचा विचार आहे, असे उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

बेस्ट बसमधून सध्या २५ लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. कोरोना काळाआधी ही प्रवासी संख्या साधारण ३२ ते ३५ लाख इतकी होती. या प्रवाशांना बेस्ट आगारात किंवा स्थानकात पास उपलब्ध केले जातात आणि दररोजचे तिकीट हे वाह्काकडून प्रवाशांना प्रवासादरम्यान मिळते. मात्र, अद्याप मोबाईल तिकीट सेवा उपलब्ध करण्यात आली नव्हती. तिकीट प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन रोख व्यवहार टाळण्यासाठी उपक्रमाने प्रवाशांसाठी नवीन मोबाईल तिकीट अ‍ॅप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशाला अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्याही तिकीट काढता येऊ शकते, अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.

हे ही वाचा:

…तर उत्तेजके घेणारे खेळाडूही ठरू शकतील राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र!

दाऊद टोळीचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू

…म्हणून नवऱ्याने दोन महिन्यांच्या मुलीला टाकून दिले!

बोरिवली पश्चिमेचा स्कायवॉक बनला भिकारी, गर्दुल्ल्यांचा अड्डा!

अ‍ॅपमधून काढलेले तिकीट किती वेळासाठी वैध असेल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. अ‍ॅपवरूनच बसचा पास काढता येणार आहे. तिकिटाचे आणि पासचे शुल्क अदा करण्याची सोय अ‍ॅपमध्ये असणार आहे. प्रवाशाच्या वेळी तिकीट किंवा पास वाहकाला दाखवावे लागणार आहे. प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये आणि रोख व्यवहार टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ सुविधेची अंमलबजावणी डिसेंबर २०२१ पासून करण्याचा विचार चालू आहे, असेही महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले. प्रवासादरम्यान हे कार्ड वाहकाला दाखवल्यास तो यंत्राच्या सहाय्याने त्याची वैधता तपासून तिकीट देईल. या कार्डमधून तिकिटाचे पैसे अदा केले जातील. त्यासाठी या कार्डमध्ये पैसे असणे आणि ते रिचार्ज करणे आवश्यक असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा