25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाखरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी

Google News Follow

Related

“बजरंग खरमाटे यांच्या ₹१५ कोटीचा “प्रथमेश फार्म हाऊस” भुगाव पुणे जिल्हा ला भेट दिली. खरमाटे यांच्याकडे ४० प्रॉपर्टीज, मार्केट व्हॅल्यू ७५० कोटी रुपये आहे.” असं ट्विट करत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचे सहकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  बजरंग खरमाटे हे सोमवारी दुपारी १२ वाजता ईडीच्या चौकशीला हजर राहिले. मनी लाँड्रिंग प्रकरणी खरमाटे हे चौकशीला आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती असलेल्या बदली गैर व्यवहार प्रकरणात खरमाटे याचं नाव समोर आल्यानंतर ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. काही दिवसांपूर्वी खरमाटेच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. ४.३० तास झाले खरमाटे यांची चौकशी सुरू आहे. या कारवाई दरम्यान काही महत्वाचे पुरावे हाती लागले असल्यानेच ईडीने खरमाटे यांना चौकशसाठी आज बोलावले आहे.

हे ही वाचा:

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

ऐन गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी

आज मोदी ब्रिक्स परिषदेला संबोधणार

सचिन वाझे ५ स्टार हॉटेलमध्ये वेश्येला भेटायला

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी भागातील फार्महाऊसची आणि अन्य ठिकाणच्या मालमत्ता पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रथमेश फार्महाऊसमधून ट्विटरवर एक व्हिडिओदेखील शेअर केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा