24 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरराजकारणशिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?

शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?

Google News Follow

Related

“संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेक मराठी माणसं वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत, म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस? किंबहूना बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटींच्या पेंग्विन ‘बालनाट्याच्या शो’ चे तिकीट घेणे नाकारले आहे.” असं म्हणत आमदार यांनी शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला.

बेळगाव महापालिकेवरुन भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? मराठी माणसाचा एवढा आकस का? असे प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी विचारले आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, असा संताप बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी व्यक्त केला होता. त्याला पडळकरांनी उत्तर दिलं.

महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे आणि कलम ३७० चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदुस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुश करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार

संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री

बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!

वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप आणि तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे. किंबहुना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या १५ कोटीच्या ‘पेंग्वीन’ विकासाचं मॉडेल नाकारले आहे. हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता आणि इतरांचा सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, असा हल्लाबोल पडळकर यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा