25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषसुनील यादव यांच्या रूपातील अजातशत्रू जननेता गमावला

सुनील यादव यांच्या रूपातील अजातशत्रू जननेता गमावला

Google News Follow

Related

उपस्थितांनी वाहिली अश्रुपूर्ण श्रद्धांजली

नगरसेवक सुनील यादव यांच्या आपल्यातून अकाली जाण्याने छोट्यात छोट्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणारा, संघविचारांच्या प्रचार, प्रसारासाठी अखंड धडपडणारा, धाडसी, अजातशत्रू, प्रकृतीची काळजीही न करता रस्त्यावर उतरणारा, तत्त्वांशी, विचारांशी कधीही तडजोड न करणारा असा संघाचा आणि भाजपाचा निस्सीम कार्यकर्ता तसेच जननेता आपण गमावला आहे, अशी भावना उपस्थितांनी रविवारी व्यक्त केली. सुनील यादव यांच्या आठवणीने उपस्थितांना अश्रु आवरता आले नाहीत.

अंधेरीतील भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते सुनील यादव यांचे नुकतेच निधन झाले. अंधेरी येथील चटवानी हॉलमध्ये सुनील यादव यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उपस्थितांनी सुनील यादव यांच्या असंख्य आठवणी जाग्या केल्या. नगरसेवक अभिजित सामंत यांनी या श्रद्धांजली सभेचे नियोजन केले. यावेळी सुनील यादव यांची पत्नी संध्या, मुले दिशा आणि गौरव हेदेखील उपस्थित होते. त्यांचे सांत्वन करताना उपस्थितांना दुःख आवरता येत नव्हते.
माजी राज्यपाल राम नाईक, भाजपाचे केंद्रीय सचिव सुनील देवधर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा नेते ऍड. आशीष शेलार, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, भाजपा नेता अशोक पांडे एवढेच नव्हे तर शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर, शिवसेना आमदार रमेश लटके, काँग्रेस नेते सुरेश शेट्टी आदिंनी सुनील यादव यांना आदरांजली अर्पण केली.

सुनील यादव यांच्यासह प्रारंभापासून कार्यरत राहिलेले भाजपाचे केंद्रीय सचिव सुनील देवधर यांनी आपल्या या सुहृदाच्या अकाली जाण्याबद्दल मनाला अतीव वेदना होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सुनीलच्या जाण्याने मला प्रचंड दुःख झाले. सगळे कार्यक्रम रद्द करून मी अंत्यदर्शनाला पोहोचलो. त्याला बघितल्यावर मला धक्का बसला. हाच तो सुनील यादव का? असा प्रश्न मला पडला आणि उर दाटून आला. तो तरुण तडफदार कार्यकर्ता होता. त्याच्यासारखा एक अत्यंत तेजस्वी कार्यकर्ता आम्ही गमावला. सहा वर्षे आम्ही एकत्र काम केले. चैतन्याने भरलेला सुनील पुढे जननेता बनला. कधी त्याला अहंकार नव्हता. राग मनात माझ्या या मित्राला श्रद्धांजली. त्याच्या नावाने अंधेरीत जी संकल्पना राबविली जाईल, त्यात माझे निश्चित योगदान असेल.

ऍड. आशीष शेलार यांनीही सुनील यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या. त्याच्याशी माझे अतिशय आपुलकीचे नाते होते. त्याचा संघर्ष मी पाहिलेला आहे. त्याच्या कामात सातत्य होते. कारकीर्दीतीला एकेक टप्पा त्याने स्वकष्टाने पार केला होता. स्वतःला नेता बनविण्यासाठी तडजोड करणारे आयुष्य त्याचे कधीच नव्हते. संघाचा विचार हीच माझी प्रेरणा असा विचार जगणारा सगळ्या कार्यकर्त्यांचा तो आदर्श आहे. सुनीलला गोड गळ्याची देणगी लाभली होती. वंदेमातरम, संघाची गीते, प्रार्थना तो अगदी गोड स्वरात म्हणत असे, असेही त्यांनी नमूद केले.

माजी मंत्री विनोद तावडे म्हणाले की, कार्यकर्ता कसा असावा हे सुनीलने दाखवून दिले. जनतेशी संपर्क असलेला कार्यकर्ता असावा हे त्याच्या कामातून दिसत होते. तो जनतेच्या वेदनेशी जोडलेला होता. बरोबरच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत असे.

हे ही वाचा:

जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल

‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी

मुंबईतील ‘बॅंक चोर’ नायजेरियन टोळीला ग्वालियरमधून अटक

प्रवाशांनो, ‘रूळ’ मोडू नका, पुलावरून जा!

आमदार पराग अळवणी म्हणाले की, सुनील अत्यंत चांगला नगरसेवक होता. एवढा की, आपल्या तब्येतीच्या काळजीपलिकडे जाऊन आपल्या मतदारसंघातील लोकांची काळजी त्याने केली. आपल्या मतदारसंघाची काळजी घेणारा नगरसेवक म्हणून सुनील मला माहिती आहे. ज्या काळात सुनीललाच काय कुणालाच काय होईल हे ठाऊक नव्हते त्या काळातही तो त्याच हिरिरीने काम करत होता. सुनील यादव याच्या गुणांकडे पाहिले तर वेगवेगळ्या गुणांचे मिश्रण हे सुनीलमध्ये पाहायला मिळते. सोने आणि चांदीचे एकत्र मिश्रण तो होता. प्रचंड जनसंपर्क हे त्याचे वैशिष्ट्य होते. एकट्याने वॉर्ड अध्यक्ष म्हणून १००० लोकांना गोळा करून आपल्या कामाचा अहवाल त्याने प्रसिद्ध केला. असा त्याचा वॉर्ड अध्यक्ष असतानाचा जनसंपर्क होता. एका चौकटीच्या पलिकडे जाऊन काम करण्याची त्याची हातोटी होती.
शिवसेना आमदार लटके, खासदार गजानन कीर्तीकर यांनीही सुनील यादव यांच्या कार्याची दखल घेतली.

अभिनेते मनोज जोशी हेदेखील सुनील यादव यांच्या आठवणीने भावूक झाले. आम्ही एक सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार अशोक जाधव यांनीही सुनील यादव यांना आदरांजली अर्पण केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा