30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाकुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!

कुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!

Google News Follow

Related

परेल येथे २०१६ मध्ये झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावला होता. त्याच्या नुकसान भरपाईसाठी त्या दुर्दैवी तरुणाच्या कुटुंबाला पाच वर्षे वाट पाहावी लागली.

त्याच्या कुटुंबाला २० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शेखर पुजारी असून तो त्याच्या कामासाठी जात असताना हा भीषण अपघात घडला होता. सकाळी शेखर त्याच्या दुचाकीवरून परेल येथून जात असताना मागून येणाऱ्या एका खासगी बसने पुढे जाण्याच्या प्रयत्नात शेखरच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर शेखरला त्वरित केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दरम्यान शेखरचा मृत्यू झाला.

बस चालक अगदीच गाडीच्या जवळून बस चालवत असताना दुचाकीला धडक दिली. बस ही अवजड वाहनांमध्ये येते आणि वाहन चालवताना सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य असते. मात्र बस चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि हा अपघात घडला, असे न्यायालयाने सांगितले. २०१६ मध्येच शेखरच्या कुटुंबाने उत्तर- पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. बस चालकाविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली होती. बस ही महामंडळाच्या मालकीची असल्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या

अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस

प्रवाशांनो, ‘रूळ’ मोडू नका, पुलावरून जा!

सरकारी अधिकारी पाच मिनिटांच्या सुट्टीचा करणार उप’योग’

महामंडळाने शेखरची चूक होती असे सांगितले. शेखर बसला ओलांडून जात होता आणि गाडीचा वेग जास्त होता. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो पडला. शेखरची गाडी बसच्या पुढच्या चाकाजवळ आल्याने ती १० फूट फरफटत पुढे आली, असेही महामंडळाने सांगितले. मात्र बस चालकच गाडी वेगात आणि नियमांचे दुर्लक्ष करत चालवत होता या मतावर न्यायालय ठाम राहिले आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा