31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेष'बेस्ट'ने एसटीला ७१ कोटी दिले तर पगार तरी निघतील!

‘बेस्ट’ने एसटीला ७१ कोटी दिले तर पगार तरी निघतील!

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अवस्था दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यात आता भर पडली आहे ती थकबाकीची. तब्बल ७१ कोटी रुपये एसटीला बेस्ट कडून येणे अपेक्षित आहे. पण ही रक्कम बेस्टकडून मिळालेली नसल्याने आधीच डबघाईस आलेल्या एसटीची अवस्था अधिकच मरणासन्न झाली आहे.

गेल्या वर्षी ‘बेस्ट’च्या सोबतीने एसटीच्या १००० बसेस मुंबईत धावत होत्या. २४ सप्टेंबर २०२० ते १२ जून २०२१ या कालावधीत एसटी बसेस मुंबईत धावल्या. त्या काळात रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने वाहतूक व्यवस्थेला एसटीची साथ लाभली होती. पण १३ जूनपासून ही व्यवस्था बंद करण्यात आली. मात्र एसटीचे पैसे दिले गेले नाहीत.

‘बेस्ट’ने एसटीला १ अब्ज ९९ कोटी ८३ लाख ६६ हजार ८३२ इतके रुपये देणे अपेक्षित होते. त्यातील इंधनाचा ३५ कोटी ३८ लाख ६३ हजार ७९९.८५ रुपये इतका खर्च वजा जाता ९२ कोटी ९९ लाख ६७ हजार ४२२ रुपये ही रक्कम बेस्टने एसटीला दिली. १८ मे २०२१ला ही रक्कम मिळाली आहे. पण उर्वरित ७१ कोटी ४५ लाख ३५ हजार ६१० रुपये ही रक्कम अद्याप येणे बाकी आहे.

सध्या एसटीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. जवळपास ९७ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जुलै, ऑगस्टचा पगार देण्याएवढेही पैसे एसटीकडे नाहीत. अशा परिस्थितीत ही रक्कम मिळाली तर एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देता येईल.

हे ही वाचा:

अरमान कोहली १४ दिवस न्यायालयीन कोठडीत

पंजशीर, अहमद शाह मसूद आणि भारत

शेअर बाजारात तेजी; पण सोने पडले फिके

३५० तालिबान्यांचा खात्मा

यासंदर्भात पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि बेस्ट कमिटी सदस्य रवि राजा यांच्याकडे यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने पाठपुरावा केला आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी हा पाठपुरावा करण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

आता हे पैसे कधी मिळणार आणि एसटी कर्मचाऱ्यांना केव्हा दिलासा मिळणार हे सांगणे कठीण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा