न्यायालयांचे आदेशानंतर मंगळवारी दुपारी सचिन वाझेला भिवंडीतील नारपोली येथे असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या सर्व चाचण्या करून शस्त्रक्रियेची तारीख ठरवण्यात येणार आहे.
वाझेला भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आपले असता त्याला भेटण्यासाठी अनेक ओळखीचे सहकारी , नातेवाईक हितचिंतकानी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. मात्र त्यांना वाझेला भेटू दिले जात नसल्यामुळे काही वेळासाठी रुग्णालयाच्या बाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना शांत करून रुग्णालय परिसर रिकामा करून घेतला आहे. रुग्णालयाच्या बाहेर आणि आतमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हे शाखेचे अधिकारी देखील लक्ष ठेवून असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.
सचिन वाझे याला मधूमेह असून तो अद्याप नियंत्रणात नसून २९ ऑगस्ट रोजी वाझेचे जे.जे रुग्णालयात ब्रेनचा एमआरआय करण्यात आला असून तो नॉर्मल असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. वाझे याची २डी इको आणि एन्जोग्राफी केल्यानंतर त्याची एन्जोप्लास्टी करायची कि ओपन हार्ट सर्जरी करायची हे ठरवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले. पहिल्या मजल्यावर एका अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी सचिन वाझे याला ठेवण्यात आले आहे. या खोलीच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून खोलीच्या बाहेर तुरुंग रक्षक,स्थानिक पोलिस ठाण्याचे तसेच गुन्हे शाखेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अशी झाली पहिली भारत तालिबान भेट…
रेल्वेच्या डब्यांना आता यांत्रिक ‘आंघोळ’…वाचा!
खासगी क्लासचालकांचे इंटिग्रेटेड उद्योग
सचिन वाझेच्या रक्तवाहिनीत सापडले तीन मोठे ब्लॉक
वाझेला ठेवण्यात आलेल्या खोलीत कोणाचाही मोबाईल फोन आत जाणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे, तसेच रुग्णालायचे डॉक्टर ,नर्स ,स्टाफ तसेच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत खोलीच्या बाहेर रजिस्टर ठेवण्यात आलेले आहे, त्यात खोलीच्या आत बाहेर करणाऱ्याला त्यात नोंदणी करावी लागेल अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.