हिमाचल प्रदेश या राज्याने एक आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे. हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले असे राज्य ठरले आहे जेथील १००% प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. म्हणजेच राज्यातील १८ पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व नागरिकांचा कोरोना लसीचा किमान एक डोस घेऊन पूर्ण झाला आहे. हा विक्रम नोंदवणारे हिमाचल हे भारतातले पहिले राज्य ठरले आहे.
भारतात सध्या १८ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रौढ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. देशभरात अतिशय वेगाने होणाऱ्या लसीकरणात हिमाचल प्रदेशने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असा एकही प्रौढ नागरिक नाही ज्याला कोविड लसीचा किमान एक डोसही दिला गेला नाही. याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर राजीव सैझल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे जाऊन त्यांनी हे ही सांगितले आहे की ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मनसुबा आहे.
हे ही वाचा:
लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी
तब्बल २३ वर्षांनी पाकिस्तानातून तो परतला आणि…
कोरोना या जागतिक महामारीच्या विरोधात लस हे एकमेव प्रभावी अस्त्र आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही भारतात सुरू आहे. या लसीकरणात भारत केवळ उत्कृष्ट कामगिरी करत नसून वेळेच्या आधीच आपले लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल देखील करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत भारताने ६० कोटी लसी देण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण महिना अखेरीस भारताने एकूण ६५ कोटी पेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत.