सध्याच्या घडीला अकरावीचा प्रवेश हा अनेकांसाठी कळीचा मुद्दा झालेला आहे. राज्यात सध्या अकरावी प्रवेश सुरु झालेला आहे. खासगी क्लासचालकांचे मात्र या सर्वामध्ये चांगलेच फावताना दिसत आहे. केवळ इंटिग्रेटेड हा सोन्याचा वर्ख लावून खासगी क्लासेस सध्या खोऱ्याने पैसा कमावत आहेत. खासगी क्लासेसच्या जागेत कनिष्ठ महाविद्यालये चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांकडून अशी लूट सुरू आहे.
नावापुरते अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊन वर्षभर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येत नाही. मात्र खासगी क्लासेसना हजेरी लावतात. खासगी क्लासेसच्या जागेत कनिष्ट महाविद्यालये चालवणारे यात अग्रक्रमी आहेत. केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या हेतूने अनेक खासगी क्लासेसचे रुपांतर आता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये झालेले आहे. यातील मूळ मेख म्हणजे, केवळ कनिष्ठ महाविद्यालये असा दर्जा मिळवून खासगी क्लासचालक खुष आहेत. परंतु कनिष्ठ महाविद्यालातील पायाभूत सुविधा या क्लासचालकांकडे औषधालाही नाही आहेत हे चित्र आहे. लाखो रुपयांचे शुल्क भरून अनेक विद्यार्थ्यांचा ओढा या खासगी क्लासचालकांकडे सध्याच्या घडीला आहे. सध्याच्या घडीला अनेक शिक्षकही महाविद्यालयांमध्ये नीट लक्ष देऊन शिकवत नाहीत. महाविद्यालयापेक्षा खासगी क्लासेसमध्ये शिकवण्याला अनेक शिक्षक प्राधान्य देताना दिसतात.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेशचा अनोखा विक्रम! १०० टक्के प्रौढांना लसीचे डोस
शिल्पा शेट्टी राहणार राज कुंद्रापासून वेगळी?
सर्वसामान्यांना मंदिरात बंदी; पण शिवसेना नेते साधताहेत दर्शनाची संधी
राज्य शिक्षण मंडळाच्या जेईई, नीट आदी परीक्षांकरत बहुतांशी विद्यार्थी खासगी क्लासेसकडे वळतात. त्यामुळेच खासगी क्लासेस आकारतील ती फी देण्यासाठी पालक तयार असतात. मुलांच्या भविष्याचा विचार करून पालक शिक्षणावर लाखो पैसे खर्च करण्याची तयारीही दाखवतात. यामुळेच खासगी क्लासचालकांची चांगलीच चांदी झालेली आहे. खेदाची बाब म्हणजे आपल्याकडे शिक्षण मंडळाकडे या अशा प्रवेश परीक्षांसाठी चांगली यंत्रणा नसल्यामुळे, खासगी क्लासेसमध्ये जाण्याशिवाय पर्यायही उरलेला नाही.
यासंदर्भात शिक्षक महासंघाच्या मुकुंद आंधळकर यांचे म्हणणे आहे की, इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली महाविद्यालये खासगी क्लास चालवतात. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयाना विद्यार्थीच मिळत नाहीत. अशा इंटिग्रेटेड क्लासेसवर कारवाई व्हायला हवी.