भारतासाठी आजचा दिवस सुवर्णमय ठरला आहे. भारताने सकाळपासून स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक जिंकलं असून दिवसभरातील हे पाचवं पदक आहे. हे सुवर्णपदकही भालाफेकीतच आहे.
भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक एफ६४ स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देखील भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळालं होतं. नीरज चोप्रा या ऍथलिटने हे पदक मिळवले होते. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून आज सकाळीच महिला नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकल होतं.
#TokyoParalympics, Men's Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m pic.twitter.com/fQqBgevgHZ
— ANI (@ANI) August 30, 2021
सुमितने सुवर्णपदक जिंकलेल्या स्पर्धेत एकवेळा नाही, दोनवेळा नाही तर तीन वेळा स्वत:चच वर्ल्ड रेकॉर्ड तोडलं. स्पर्धेत सहा प्रयत्ना सुमितने पहिला थ्रो ६६.९५ मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने २०१९ मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने ६८.०८ मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा ६८.५५ मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवा जागतिक विक्रमही केला.
सुमित पैलवान होऊन कुस्ती खेळू इच्छित होता. पण एका अपघातात त्याचं हे स्वप्न उद्ध्वस्त झालं. योगेश्वर दत्त यांना पाहून कुस्ती शिकणाऱ्या सुमितचा २०१५ मध्ये अपघात झाला होता. तो दुचाकीवरुन जात असताना एका ट्रॅक्टरचा धक्का लागला. ज्यात ट्रॅक्टर त्याच्या पायावर चढला आणि तो पाय गमावून बसला. पण त्यानंतरही त्याने मेहनत घेत भालाफेक खेळांत स्वत:ला झोकून दिलं. ज्यानंतर आज अखेर सुवर्णपदक जिंकत भारताचं नाव जगभरात केलं आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत कोविडचा पुन्हा धुमाकूळ
अमेरिकेच्या रॉकेटने काबुल विमानतळावरील अनर्थ टळला
औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे
‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे
सुमित अंतिलने द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित प्रशिक्षक नवल सिंह यांच्या सल्ल्यानुसार भालाफेक खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला. पण ५ व्या क्रमांकावर आल्याने त्याचं पदक हुकलं. अखेर २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पदक जिंकत पॅरालिम्पिक्स खेळांसाठीही पात्रता मिळवली.