वसई- विरार शहरात चोऱ्या, घरफोडी, अमली पदार्थ वाहतूक अशा प्रकारचे गुन्हे करून आरोपींनी उच्छाद मांडलेला आहे.
या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडाडीची कामगिरी करत तब्बल ४३ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वसई- विरार या शहरांमध्ये चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त सुरू करण्यात आले. या पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात ४३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वसई- विरार शहरांसोबतच मिरा- भाईंदर परिसरात घरफोडी, सोनसाखळी चोरी, ऑनलाईन जुगार, देहविक्री व्यवसाय, अमली पदार्थ वाहतूक आदी गुन्हेगारांचा वावर चांगलाच वाढला होता. मात्र आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश येत आहे. गुन्हे करून त्या परिसरातून फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यातही पोलिसांना यश येत आहे.
हे ही वाचा:
जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ
ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमणांचे जंगल
वसई- विरारमध्ये गुन्हे करून अनेक आरोपी मुंबई, उपनगराच्या बाहेर निघून गेले होते. मात्र पोलिसांनी तपास करून अशा आरोपींना सोलापूर, कोल्हापूर, अंधेरी, कांदिवली तसेच गुजरात आणि अन्य राज्यांतूनही शोधून काढले आहे. ठाणे, नवी मुंबई, मुंबई पुणे अशा भागांत गुन्हे केलेल्या अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथील ज्वेलर्सवर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली.
पोलिसांनी आतापर्यंत ८२ गुन्ह्यांची उकल केली असून ४३ आरोपींना अटक केली आहे. ६९.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. देहविक्री व्यवसायातून १८ जणांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.