25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषपॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या 'योद्ध्या'ची कहाणी

पॅरालिम्पिकमधील एका मराठमोळ्या ‘योद्ध्या’ची कहाणी

Google News Follow

Related

ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले सुवर्ण पदक म्हटले, की आठवते ते २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमधील अभिनव बिंद्रा यांनी पटकावलेले सुवर्ण पदक. मात्र यापूर्वीही भारताच्या एका खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली होती. हेडलबर्ग येथे १९७२ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. मुरलीकांत यांनी ३७.३३ सेकंदांची वेळ नोंदवून ही ‘सुवर्ण’ कामगिरी केली होती. २०१८ मध्ये त्यांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मुरलीकांत पेटकर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. भारतीय सैन्यदलातील कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रोनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर (इएमइ) विभागात ते सेवा देत होते. पेटकर हे एक उत्कृष्ट बॉक्सर होते आणि १९६८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण नियतीला तेव्हा ते मान्य नसावं. १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान मधील युद्धाला तोंड फुटले. दरम्यान पेटकर यांना बुलेटच्या गोळ्यांमुळे गंभीर जखमा झाल्या आणि त्यातच त्यांना अपंगत्व आले. पेटकर यांनी त्याही परिस्थितीत हार न मानता भरपूर मेहनत घेऊन तेल- अविवमध्ये झालेल्या १९६८च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला. तेव्हा त्यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यांचे पदकाचे स्वप्न अपूर्णच राहिले.

हे ही वाचा:

कोरोनाचाचणीच्या प्रमाणपत्राचे गणेशभक्तांपुढे विघ्न

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

‘पब्जी’तून लाखो गमावणारा मुलगा अखेर सापडला!

त्यांच्या पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेनंतर त्यांचे लक्ष्य होते ते १९७२ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेवर. दरम्यानच्या काळात त्यांनी जलतरण आणि इतर खेळातही लक्षणीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी जलतरण स्पर्धेत चार पदकांची कमाई केली. १९७२ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी जलतरण, भालाफेक खेळांमध्ये सहभाग घेतला होता. जलतरण स्पर्धेत मुरलीकांत यांनी ३७.३३ सेकंदांची वेळ नोंदवून ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि इतिहास रचला. भालाफेक खेळामध्येही अंतिम फेरीपर्यंत त्यांनी धडक मारली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा