27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसायकल ट्रॅकसाठी खर्चाची मूळ रक्कम होती....वाचा!

सायकल ट्रॅकसाठी खर्चाची मूळ रक्कम होती….वाचा!

Google News Follow

Related

लोकोपयोगी प्रकल्प बासनात, फॅन्सी प्रकल्प मात्र जोशात अशी स्थिती सध्याच्या घडीला मुंबईत पाहायला मिळत आहे. वांद्रे किल्ल्यापासून माहीम किल्ल्यापर्यंत समुद्राच्या किनाऱ्यावर वॉकवे-कम-सायकल ट्रॅक बांधण्यासाठी महापालिकेने १६८ कोटी रुपयांची निविदा काढल्या आहेत पण प्रत्यक्षात हा खर्च केवढा होता हे ऐकल्यावर धक्काच बसतो.

२० कोटींवरून हा खर्च १६८ कोटींवर गेल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी “फॅन्सी प्रोजेक्ट्स” वर पैशांचा अपव्यय करत आहे असे स्पष्ट म्हटले आहे. निधीअभावी महापालिका नागरी सुविधांची कामे रखडवत आहे.

नागरी सुविधांपेक्षा महापालिकेचा कल अशा प्रकल्पांकडे असल्यामुळे आता नाराजी दिसून येत आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पासाठी स्थानिकांनीही चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे. २० कोटींचा हा प्रक्लप १६८ कोटींवर कसा गेला याची मागणी आता महापालिकेमध्ये केली जात आहे. प्रकल्पाची मूळ किंमत ही प्रकल्प ठरताना २० कोटींची होती, परंतु नंतर मात्र महापालिकेने हा प्रकल्प १६८ कोटींचा दाखवला त्यामुळेच आता महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. म्हणूनच आता काँग्रेस नगरसेवक असीफ झकारीया यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहून हा खर्च वाढला कसा यावर उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, भूमिपुत्रांना बाजूला करू नका!

न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला अर्धांगवायूचा झटका

अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती

पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने केले नऊ एफआयआर

एकीकडे पालिकेने निधीच्या अभावामुळे १२०० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे आणि १५० कोटी रुपयांची नागरी शाळा सुधारणा प्रकल्प थांबवले आहेत आणि आता हे सायकलिंग ट्रॅक बनवू पाहात आहेत. वांद्रे किल्ल्यापासून माहीम किल्ल्यापर्यंतचा वॉक-कम-सायकल ट्रॅक ६ मीटर रुंद असेल. “सायकल ट्रॅक २.५ मीटर रुंद असेल आणि उर्वरित जागा पादचाऱ्यांसाठी असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा