26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतभारतात लवकरच स्वदेशी रिग्ज

भारतात लवकरच स्वदेशी रिग्ज

Google News Follow

Related

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप

भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलीय. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केलीय. एमईआयएलच्या या नव्या यशामुळे भारताचं मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार आहे. बुधवारी (२५ ऑगस्ट) अहमदाबादमध्ये एमईआयएलने पहिली स्वदेशी रिग्जचं तेल उत्पादक सरकारी कंपनी ओएनजीसीला हस्तांतरण केलं. भारतासाठी तंत्रज्ञान स्वालंबनात ही मोठी उपलब्धता मानली जात आहे.

अत्यंत खोल समुद्रात खनिज तेल उत्पादनात रिग्जची भूमिका महत्त्वाची असते. याचं तंत्रज्ञान अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असतं. असं असताना ही यंत्रणा उभी करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील मोजक्या देशांपैकी एक बनलाय. यामुळे जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढणार आहे. एमईआयएलनेचे प्रमुख बोमारेड्डी यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा हस्तांतरीत केली. यावेळी ऑईल रिग्ड विभागाचे प्रमुख एन. कृष्णाकुमार, उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी हेही उपस्थित होते.

एमईआयएलला ओएनजीसीकडून एकूण ४७ तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जच्या निर्मितीचं काम मिळालं आहे. याची एकूण किंमत ६,००० कोटी रुपये आहे. याचाच भाग म्हणून एमईआयएलने पहिली रिग्ज ओएनजीसीकडे सुपुर्त केली. यासह एमईआयएल देशातील पहिली खासगी कंपनी बनलीय जिने खनिज तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जची स्वदेशी तंत्रज्ञानावर निर्मिती केलीय.

हे ही वाचा:

आयएसआयएस-खुरासानने स्वीकारली काबुल बॉम्ब हल्ल्याची जवाबदारी

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

… तर आंदोलनाला सामोरं जा

जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?

मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बनवलेल्या या रिग्ज जुन्या रिग्जच्या तुलनेत खूप विकसित आहे. त्यामुळेच त्या कमीत कमी उर्जेवर अधिक क्षमतेने काम करु शकतील. त्यामुळे खनिज तेल उत्पादनाचा वेग वाढून खर्च कमी होणार आहे. या रिग्जची क्षमता १,५०० हॉर्सपॉवर असेल. ही यंत्रणा ४,००० मीटर खोलीपर्यंत अगदी सहजपणे खोदकाम करु शकेल. या रिग्ज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळपास ४० वर्षे खनिज तेल उत्पादन करु शकतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा