22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणप्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार

प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाचे आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे सध्या चर्चेत आहेत. पण मुंबई भाजपाचे सचिव प्रतीक कर्पे यांनी वरून सरदेसाई यांची हवा काढली आहे. वरुण सरदेसाई यांनी भाजपावर केलेल्या टीकेला कर्पे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘वरुण सरदेसाई तुम्ही बाळासाहेबांची शिकवण धुळीला मिळवली आहे’ असे म्हणत कर्पे यांनी हल्लाबोल केला आहे.

मंगळवारी नारायण राणे यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या सगळ्या राडेबाजीत राणे कुटुंबीय उपस्थित नसताना त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर वरून सरदेसाईंच्या नेतृत्वात युवा सेनेने आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडालेला दिसला. तर सरदेसाई हे पोलिसांना शिवीगाळ करतानाही दिसले.

हे ही वाचा:

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा

एवढं सगळं झाल्यानंतर गुरुवारी सरदेसाई यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले? असा सवाल सरदेसाई यांनी केला होता. यावरूनच मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीवर असणाऱ्या कर्पे यांनी सरदेसाईंवर पलटवार केला आहे. वरून सरदेसाई आणि युवा सेनेने बाळासाहेबांची शिकवण धुळीला मिळवल्याचा घणाघात कर्पे यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा