22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामासंशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा

संशयित वॅगनार आणि अटकेत चार! ठाण्यातील भरत जैन हत्याकांडाचा उलगडा

Google News Follow

Related

काही दवसांपूर्वी कालवा खाडीत मृतदेह आढळलेल्या भारत जैन हत्या प्रकरणाचा तपस पूर्ण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून लुटीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

ठाण्यातील मखमली तलाव येथील नीलकंठ सोसायटी मध्ये राहणारे ज्वेलर्स भरत जैन यांचे अपहरण होऊन हत्या झाली होती. हत्येनंतर त्यांचा मृतदेह कळवा येथील खाडीत फेकण्यात आला होता. या हत्येमुळे सारे ठाणे शहर हादरून गेले होते. व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती. तर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

ठाण्यातील नौपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नौपाडा विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दोन पथक तयार केलीआणि या हत्याकांडाचा तपस सुरु केला.

भरत जैन यांच्या दुकानातील आणि आसपासच्या परिसरातील १६ पेक्षा अधिक सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. त्या मध्ये त्यांना एक संशयीत वॅगनार गाडी परिसरात फिरताना आढळली. या कारमालकाचा शोध घेतला असता ही गाडी घणसोली, नवी मुंबई येथील सुभाष बाबुराव सुर्वे नामक इसमाची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर तांत्रिक तपास केला असता, त्याने आणि त्याचे साथीदार अतुल जगदीश प्रसाद मिश्रा आणि निलेश शंकर भोईर यांच्या सोबत मिळून भरत जैन यांच्या हत्येचा कट रचल्याचे कबुल केले.

हे ही वाचा:

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

असे झाले अपहरण आणि हत्या…
अटक करण्यात आलेला आरोपी अतुल मिश्रा हा भरत जैन राहत असलेल्या सोसायटी मध्ये साधारतः अडीच वर्षा पूर्वी वॉचमन म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला भरत जैन यांचे ज्वेलर्सचे दुकान असल्याचे ठाऊक होते. त्यांचा दुकानात जाण्यायेण्याचा मार्गही माहितीचा होता. त्या प्रमाणे त्यांनी प्लॅन बनवून दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान भरत जैन यांना मखमली तलावाच्या परिसरातून घरी पायी जात असताना त्यांचे अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवून जैन यांना वॅगनार कारमध्ये बसवले गेले. त्यांना मुंबई नाशिक महामार्गावर आणले गेले.

या वेळी आरोपी अतुल मिश्रा याला भरत जैन यांनी ओळखले. त्यामुळे भारत जैन आपली ओळख पोलिसांना सांगतील आणि आपले बिंग फुटेल याची भीती अतुलला वाटली. त्यामुळे आरोपींनी भरत जैन यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यांच्या खिशातील दुकानाची चावी काढून घेण्यात आली. त्यांचे शव हात पाय बांधून कळवा खाडीत फेकून दिले गेले.

त्यानंतर आरोपींनी जैन यांचे बी.के ज्वेलर्स हे दुकान चावीने उघडून दुकानातील चांदीचे दागिने व भांडी चोरी केली. या गुन्ह्यातील आरोपी निलेश शंकर भोईर आणि अतुल जगदीश प्रसाद मिश्रा हे दोघे कल्याण मार्गे कोईबत्तूर, ओरिसा, बिहार येथुन उत्तरप्रदेश येथे पळून जाणार असल्याचे पोलिसांना समजले. त्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे आपल्या सहा जणांच्या पथकासह उत्तर प्रदेश येथे अगोदरच जाऊन पोहचले होते. त्या नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना पळून जाण्या करिता मदत करणाऱ्या बळवंत मारुती चोळेकर याला देखील अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले चांदीचे दागिने व भांडी असा तब्बल १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा