24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणहुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत 'भोक पडलेल्या फुग्याला' एवढे का घाबरत आहेत?

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?

Google News Follow

Related

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांना आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या दिल्याचा आरोप करत वरूण सरदेसाईंवर कारवाई का नाही? असाही सवाल केला.

“आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण सरदेसाईवर कारवाई का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघडं पाडलं. पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मानी उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

हे ही वाचा:

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

उद्धव ठाकरेंना भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारत फक्त ७८

“मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,” अशी सडकून टीका गोपीचंद पडळकर यांची राऊतांवर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा