23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरदेश दुनियासीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

Google News Follow

Related

आधी अमेरीकेनं अफगाण जनतेला तालिबानच्या जबड्यात ढकललं. आता तिच अमेरीका तालिबानसोबत गुप्त गाठीभेटी करत असल्याचं वृत्त आहे. अमेरीकेचे टॉपचे जासूस आणि तालिबानचा टॉपचा लीडर अब्दूल गनी बरादर यांच्यात काबूलमध्येमध्ये गुप्त बैठक पार पडलीय. एका मीडिया रिपोर्टनुसार १५ ऑगस्ट म्हणजेच तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर दोन्ही देशातली ही पहिली टॉपची बैठक पार पडली. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केलाय. त्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांना पळ काढून संयुक्त अरब अमीरातमध्ये आश्रय घ्यावा लागलाय.

वाशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित बातमीनुसार- अमेरीकेची गुप्तचर संघटना सीआयएचे डायरेक्टर विल्यम जे बर्न्स आणि तालिबानी नेते मुल्ला अब्दूल गनी बरादर यांच्यात काल एक गुप्त बैठक पार पडलीय. अमेरीकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीच सीआयएच्या टॉपच्या अधिकाऱ्याला तालिबानसोबत चर्चा करण्यासाठी पाठवलेलं आहे. काबूलमधून लोकांना विमानानं बाहेर काढण्यात अनेक अडचणी येतायत, त्याच पार्श्वभूमीवर ह्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. खुद्द बिडेन यांनीच, अफगाणिस्तानमधून लोकांना एअरलिफ्ट करणं इतिहासातलं सर्वात कठिण मिशन असल्याचं म्हटलंय.

जोपर्यंत अमेरीकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानमधून जात नाही तोपर्यंत सरकार स्थापनार नाही अशी भूमिका तालिबाननं घेतलीय. त्यातच अमेरीका आणि मित्रा पक्षांवर तालिबान कडक भूमिका घेत अडचणी निर्माण करतंय. त्यामुळेच अमेरीकेतल्या सैनिकांना महिन्याच्या शेवटपर्यंत अफगाणिस्तानमध्येच ठेवा, अशा दबाव मित्रपक्षांकडून वाढतोय. पुढच्या आठवड्याभरात अमेरीकेन, युरोपियन तसच इतर नागरीकांना अफगाणिस्तानमधून काढलं जाईल, तोपर्यंत अमेरीकन सैनिक अफगाणिस्तानमध्येच रहावेत असा अमेरीकेवर दबाव आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेला तालिबाननं मदत करावी याची बोलणी अमेरीका करत असल्याचं वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटलंय. तालिबान मात्र अशा कुठल्याही तडजोडीला तयार होत नाहीय. आता ह्या भेटीनंतर तालिबानची काय भूमिका असेल याची उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

अंजू बॉबी जॉर्जची ‘शैली’ गाजणार!

अमेरीका किंवा त्यांच्या मित्र देशांशी कुठलाही समझोता करायला तालिबान तयार नाही. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने स्पष्ट केलंय- जर अमेरीका आणि ब्रिटननं जर ३१ ऑगस्टच्यानंतरही स्वत:चं सैन्य जर अफगाणिस्तानमध्ये ठेवलं तर त्याचे परिणाम गंभीर होती असा इशारा तालिबाननं दिलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरीकेला अपेक्षा अब्दूल गनी बरादरकडूनच आहे. कारण अब्दूल गनी बरादर हा पाकिस्तानच्या जेलमध्ये आठ वर्ष राहीला. अमेरीकेच्या दबावानंतरच त्याला तिथून सोडण्यात आलं. आता तोच अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती असेल अशी शक्यता वर्तवली जातेय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा