27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियापॅरालिम्पिक्समध्ये अफगाणिस्तानचा ध्वज, पण खेळाडू एकही नाही

पॅरालिम्पिक्समध्ये अफगाणिस्तानचा ध्वज, पण खेळाडू एकही नाही

Google News Follow

Related

सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या कलहामुळे सारे जग हादरले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून परागंदा झाले आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे भवितव्य अंधःकारमय दिसत असतानाच पॅरालिम्पिक्स मध्ये अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकताना दिसला आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा एकही खेळाडू सहभागी झालेला नसताना हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.

ऑलिम्पिक २०२० च्या अयशस्वी आयोजनानंतर आता जपानची राजधानी टोकियोमध्ये पॅरालिम्पिक्स २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. पॅरालिम्पिक्स २०२० चा उदघाटन सोहळा काल म्हणजेच मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी पार पडला. जगभरातील विविध देशांमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्वच देशांचे चमू या सोहळ्यात सहभागी झाले होते आणि आपापल्या राष्ट्रध्वजासह संचलन करताना दिसले.

हे ही वाचा:

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’

भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

नारायण राणे यांचं काही चुकलं नाही

या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचे खेळाडूही पात्र ठरले होते. पण अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थिमुळे ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. असे असले तरीही स्पर्धेच्या आयोजन समितीने संचलनात अफगाणिस्तानच्या राष्ट्रध्वजाला स्थान देण्याचा निर्णय घेतला. या कृतीतून अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या आपण सोबत असल्याचा संदेश आयोजन समितीने दिले आहे. या स्पर्धेत विस्थापित नागरिकांचा एक चमूही सहभागी झाला आहे. त्यांच्या चमूला हा अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज देण्यात आला आणि त्यांनी या ध्वजासोबत उदघाटन सोहळ्यात संचलन केले.

या पॅरालिम्पिक्स २०२० मध्ये भारतीय खेळाडूंचा चमू सहभागी होत आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक्स २०२० च्या ऐतिहासिक कामगिरी नंतर आता पॅरालिम्पिक्स २०२० मध्ये बहाराची कामगिरी कशी होते यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून या चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा