23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात 'नारायण राणे अंगार है!'

ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’

Google News Follow

Related

सध्या महाराष्ट्रात नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय सामना चांगलाच रंगलेला आहे. पण या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे महापौरांचा ‘नारायण राणे अंगार है’ अशा घोषणा देताना दिसत आहेत आणि ते सुद्धा शिवसेना ज्याला आपला गड मानते त्या ठाणे जिल्ह्यातून! ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांची ही व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या निमित्ताने शिवसैनिकांच्या मनात जे आहे ते ओठावर आल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळ पासूनच महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलेले पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली. यावरूनच राज्याचे राजकारण तापले आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेकडून कायदा हातात घेत राणें विरोधात आंदोलन झालेले पाहायला मिळाले.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण

भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र, पाकिस्तानकडून तालिबानला फूस

मला रत्नागिरीत का जाऊ दिले जात नाही?

राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?

शिवसेना ज्याला आपला गड मानते त्या ठाणे शहरातही शिवसेने कडून अंदोलन करण्यात आले. पण भाजपाच्या ठाणे कार्यालया बाहेर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी बघून शिवसेना कार्यकर्त्यांची कार्यालया जवळ यायची हिम्मत झाली नाही. शिवसैनिकांनी लांबूनच भाजपा कार्यालयावर शाईचे फुगे टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.

दरम्यान ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भाजपा कार्यालयाच्या दिशेने येत होते. या वेळी घोषणा देताना त्यांनी ‘नारायण राणे अंगार है’ अशी ललकारी दिली. त्या मागून उपस्थित शिवसैनिकांनी बाकी सब भंगार है अशी आरोळी दिली. यामुळेच आता समाज माध्यमांवर आता शिवसेनेचे ठाण्याचे महापौर चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. ठाणे भाजपा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा