22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणसायकल ट्रॅकचा घाट कुणाच्या फायद्यासाठी?

सायकल ट्रॅकचा घाट कुणाच्या फायद्यासाठी?

Google News Follow

Related

आमदार अमित साटम यांनी विचारला प्रश्न

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे ते माहीम या पावणेचार किमी पट्ट्यात जो प्रस्तावित सायकल ट्रॅक आणि वॉकिंग वे करण्याचे ठरविले आहे, त्यावर आमदार अमित साटम यांनी टीका केली असून हा पैशांचा चुराडा असून कुणाच्या हट्टापायी हे काम हाती घेण्यात आले आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

आमदार साटम यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून या सायकल ट्रॅकसाठी पैशांचा चुराडा का केला जात आहे आणि कुणाला त्यातून लाभ मिळणार आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेने वांद्रे ते माहीम या पावणेचार किमी सायकलिंग व वॉकिंग ट्रॅकसाठी १६८ कोटीच्या निविदा काढल्या आहेत. म्हणजे एका किलोमीटरमार्गे ४४ कोटी खर्च करणार आहेत. हा खर्च एका हायवेच्या रस्त्याच्या कामापेक्षा पाच पट आहे. मग कुणाच्या हट्टापायी किंवा कुणाला लाभ मिळण्यासाठी ही निविदा मुंबई महानगरपालिकेने काढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात न घेता हे काम कोण प्रस्तावित करत आहेत.  म्हणून मी आयुक्तांना विनंती केली आहे की, मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा करणारी निविदा रद्द करावी आणि याद्वारे मुंबईकरांचा आणखी एक सवाल आहे. आमदार साटम म्हणतात की, कुणाची तरी सत्ता जाणार आहे. त्यामुळे सत्तेच्या उरलेल्या दिवसांत मिळेल तेवढे ओरबाडण्याचा निर्णय कुणी घेत आहे का,  त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत बसलेला सचिन वाझे कोण हा आमचा सवाल आहे.

हे ही वाचा:

ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ

नाशिक मध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक

‘खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर येऊन दोन हात करा’

शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश

अमित साटम यांनी पत्रात म्हटले आहे की, महानगरपालिका गेल्या २४ वर्षांत २१ हजार कोटी खर्च करूनही मुंबई शहराला चांगले रस्ते देऊ शकलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना अतिक्रमणविरहित पदपथ व वाहनांसाठी चांगले रस्ते ही मुंबईची गरज आहे. म्हणूनच १६८ कोटींच्या सायकल ट्रॅकचे हे काम रद्द करून हा पैसा अधिक चांगल्या कामासाठी उपयोगात आणावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा