22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ

ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ

Google News Follow

Related

मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर काय करणार? तुम्ही काय शिवसैनिक, ते शिवसैनिक गेले, नारायण राणेने शिवसेना सोडली, ती शिवसेना गेली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत राणेंनी उत्तर दिलं.

मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही? असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

१५ ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा