27 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरविशेषभारतात लवकरच ईव्ही चार्जिंगचे जाळे

भारतात लवकरच ईव्ही चार्जिंगचे जाळे

Google News Follow

Related

ओला कंपनीने सांगितले आहे की, जगातील सर्वात मोठे टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची कंपनीची योजना आहे. हे चार्जिंग नेटवर्क ओला हायपरचार्जर नेटवर्क म्हणून ओळखले जाईल आणि जगातील सर्वात रुंद इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्जिंग नेटवर्क असेल. ओला भारताच्या ४०० शहरांमध्ये १ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट बसवण्याची योजना आखत आहे. ओलाने चारचाकी इलेक्ट्रिक व्हेइकल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा केला नसला तरी, ते आपल्या वाहनांना चालना देण्यासाठी त्याच चार्जिंग नेटवर्कचा वापर करू शकते.

ओलाने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, ते आपल्या कारखान्याचा पहिला टप्पा उभारण्यासाठी एकूण २,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. नवीन कारखाना फ्युचरफॅक्टरी म्हणून ओळखला जाईल आणि तामिळनाडूमध्ये ५०० एकर जागेवर बांधला जाईल. या कारखान्याची वार्षिक १० मिलियन वाहनं तयार करण्याची क्षमता असेल. नवीन कारखाना जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असेल, ज्याची क्षमता जगातील एकूण उत्पादनाच्या १५% इतकी असेल.

ओला इलेक्ट्रिक कंपनीने नवीन एस १ आणि एस १ प्रो स्कूटरसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात पदार्पण केले आहे. भारतीय कंपनी आता इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारातही प्रवेश करण्याचा विचार करत आहे. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी संकेत दिले आहेत की, ते इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. ओला कंपनी २०२३ पर्यंत इलेक्ट्रिक व्हीकल प्रोजेक्टमध्ये उतरु शकते, असे भाविश यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या ग्वादारमध्ये बॉम्बहल्ला, चीनचे ८ नागरिक ठार

मी असतो तर ही वेळच आली नसती

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

भावीश अग्रवाल म्हणाले होते की, भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकी येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक असतील. भविष्यात भारताला इलेक्ट्रिक व्हेईकल हबमध्ये बदलण्यासाठी उत्पादकांनी लाभ घेणे आणि गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तथापि, सीईओने इलेक्ट्रिक चारचाकी बाजारात प्रवेश करण्याच्या त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणताही तपशील शेअर केला नाही. तुम्हाला माहित असले पाहिजे की, ओला भारतात आधीच इलेक्ट्रिक कारचा ताफा चालवते. ओलाने भारतातील विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहने चालवायला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळी त्यांची वाहनं चार्ज करण्यासाठी हब तयार केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा