देशभरामध्ये कोरोना प्रादुर्भावाचे संकट असताना, दुसरीकडे लसींचा काळाबाजार करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. देशामध्ये लसीकरणाची मोहीमही आता सुरु झालेली आहे.
आता, लसीचा काळाबाजार होत असल्याची दुर्दैवी बाब आता समोर आलेली आहे. देशभरातून लशींच्या काळाबाजाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. नुकतेच नवी मुंबई येथून एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलेले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक अजय माहुले यंच्यासह सापळा लावून आरोपीस अटक केली.
संबंधित व्यक्ती हा कोविशिल्ड लसींचा काळाबाजार करत होता. लसींचा काळाबाजार होत असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतरच लस काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. किशोर कुमार खेत हा आरोपी असून, हा कोविशिल्ड लसीचे १५ डोस ६०,००० रुपयाला विक्री करत होता. सध्याच्या घडीला तो पोलिसांच्या ताब्यात आहे. औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या तक्रारी वरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा कलम ४२०, जीवनावश्यक वस्तू कलम ३, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा कलम १८, २७ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी किशोर कुमार खेत यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
हे ही वाचा:
परमबीर सिंग यांना चांदिवाल समितीने ठोठावला दंड
म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी
मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न
मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल
नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार, किशोर कुमार खेत (कामोठे,रायगड) हा राजीव गांधी ब्रिज सेक्टर, नेरूळ नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या विक्री करत होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ०२ नवी मुंबई करीत आहे.