25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरअर्थजगतअफगाणिस्तानवर कब्जा करूनही तालिबान कंगाल

अफगाणिस्तानवर कब्जा करूनही तालिबान कंगाल

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये राजधानी काबूलचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होईल.

मात्र, नव्या राजवटीची सुरुवात करताना तालिबानच्या मार्गात एक अडथळा निर्माण झाला आहे. भविष्यात इतर देशांशी व्यवहार करण्यासाठी तालिबानकडे परकीय चलनच उपलब्ध नाही. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) तालिबानला कर्ज देण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज दिले जाते. जगातील १९० देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सदस्य आहेत. मात्र, अफगाणिस्तानातील सत्ताबदलानंतर आयएमएफने वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. अन्य देशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर तालिबानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका आयएमएफने घेतली आहे.

तालिबानकडे सध्याच्या घडीला इतर देशांशी व्यवहार करण्यासाठीचे परकीय चलन उपलब्ध नाही. अफगाणिस्तानातील मध्यवर्ती बँकेकडे ९ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा आहे. मात्र, हा साठा परदेशात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानकडे रोकड स्वरुपात परकीय चलन उपलब्ध नाही, अशी माहिती अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख अजमल अहमदी यांनी दिली.

हे ही वाचा:

तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

अफगाण फुटबॉलपटूचा ‘असा’ झाला मृत्यू

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दूरसंचार क्षेत्राला होणार फायदा

अफगाणिस्तानच्या मालकीच्या परकीय चलन भांडारात अमेरिकच्या फेडरल बँकेचे ७ अब्ज डॉलर्सचे रोखे, सोने आणि अन्य संपत्तीचा समावेश आहे. परकीय चलनाचा साठा नसल्यास अफगाणिस्तानच्या चलनाचे मूल्य घसरेल आणि देशात महागाई वाढेल. गरीब नागरिकांना याचा मोठा फटका बसेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा