25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरराजकारण'भारतात हिंदू तालिबानी आहेत' मुनव्वर राणांची मुक्ताफळे

‘भारतात हिंदू तालिबानी आहेत’ मुनव्वर राणांची मुक्ताफळे

Google News Follow

Related

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या तालिबानची वकिली करत फिरताना दिसत आहेत. हे करताना त्यांनी ‘भारतातही हिंदू तालिबानी आहेत’ असे म्हणत आपल्याच भारतीय लोकांनाच लक्ष्य करायचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी महर्षी वाल्मिकींसाठीही अपमानजनक शब्द उच्चारले आहेत. त्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांमुळे त्यांच्या विरोधात नेटकऱ्यांनी मोर्चा उघडला आहे. मुनव्वर राणा यांच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे.

‘अफगाणिस्तानपेक्षा जास्त क्रूरता ही आपल्या इथे आहे. तालिबानकडे जेवढ्या एके४७ नसतील तेवढ्या हिंदुस्थानातील माफीयांकडे आहेत. तालिबानी दहशतवादी इतरांकडून शस्त्रास्त्रे हिसकावून घेतात किंवा मागून आणतात. आपले माफिया ती विकत घेतात. उत्तरप्रदेशात पण काही तालिबानी आहेत आणि इथे हिंदू तालिबानी आहेत.’ अशी मुक्ताफळे राणा यांनी उधळली आहेत.

हे ही वाचा:

तालिबानी पिलावळीचा धोका…

तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?

का पुसावीशी वाटते अफगाणी महिला फुटबॉलपटूंना आपली ओळख?

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

तर रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांचाही अपमान राणा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये राणा सहभागी झाले होते. त्यावेळी तालिबानच्या बाजू घेऊन मुद्दा मांडताना राणा म्हणतात ‘तालिबानी हे आतंकी आहेत! पण तितकेच आतंकी आहेत, जितके वाल्मिकी होते. वाल्मिकिंनी रामायण लिहिले म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. पण त्याच्या आधी ते डाकूच होते’ असे बेजबाबदार विधान राणा यांनी केले आहे.

या आधीही एका चर्चेमध्ये त्यांनी तालिबानी लोकांना आतंकवादी म्हणण्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते ‘तालिबानी लोकांना आतंकवादी म्हणू शकत नाही. तसे योग्य ठरणार नाही. त्यांना आपण आक्रमक म्हणू शकतो’ असे सांगत राणा यांनी तारे तोडले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा