29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाकास पठार पर्यटकांसाठी खुले! पण केव्हापासून??

कास पठार पर्यटकांसाठी खुले! पण केव्हापासून??

Google News Follow

Related

पावसाळ्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. यंदा कोरोनामुळे पर्यटनावर मर्यादा होत्या. परंतु तरीही आता काही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली होत आहेत. साताऱ्याजवळील कासचे पठार पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे.

जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुले करण्यात येणार असून कोरोनाचे नियम पाळत ऑनलाइन बुकिंगने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या पंचवीस ऑगस्टनंतर स्थानिक परिस्थितीनुसार, एक सप्टेंबरपर्यंत अधिकृतरित्या फित कापून हंगामाचे उद्घाटन करण्यात येईल.

हे ही वाचा:

दहावी-बारावी शिकलेल्या डॉक्टरांची गोवंडीत क्लिनिक्स ! वाचा…

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया

हंगाम पर्यटकांना खुला करण्यासाठी व पदाधिकारी निवड करण्यासाठी नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कास पठाराच्या संयुक्त कार्यकारी वन समितीने बैठक आयोजित करून पुष्प पठार पर्यटकांसाठी येत्या २५ ऑगस्टनंतर खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे नियम पाळून ऑनलाइन आरक्षण केल्यानंतरच पठारावर प्रवेश दिला जाणार असून प्रत्येकी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहन पार्किंग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहे. या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण व सहा गावचे वनसमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळदीची पांढरी फुले पहायला मिळत असून काही विविध जाती-प्रजातींच्या फुलांच्या तुरळक कळ्या उमलू लागल्या आहेत. येत्या दहा पंधरा दिवसांत पठारावर रंगीबेरंगी फुले पहायला मिळणार असून सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे ताटवे पाहायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा