28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणशिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

Google News Follow

Related

नारायण राणेंचे बॅनर्स हटवले

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होत आहे. मात्र मुंबई मनपाने माहिम, शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले.  त्यामुळे शिवसेनेचं सुडाचं राजकारण लक्षात घेता भाजपाने सेनेवर टीका केली आहे.

नारायण राणे यांचं सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

दरम्यान नारायण राणे यांच्या आगमनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नितेश आणि निलेश राणे हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपा नेते प्रमोद जठार आणि कालीदास कोळंबकर हे देखील उपस्थित आहेत.

बाळासाहेब हे कुण्या पक्षाचे नेते नसून सर्व राष्ट्राचे नेते आहेत. ठाकरे कुटुंबाने राणेंना स्मारकावर यायला विरोध केला नाही, शिवसेनेच्या इतर नेत्यांनी देखील मोठे मन करावे. २०२४ मध्ये कोण किती पाण्यात आहे हे दिसेल, असं आव्हान भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिलं.

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजप नेते नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागणार आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

हे ही वाचा:

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहेत. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा