26 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरराजकारणउद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगनगरी औरंगाबादमध्ये उद्योजकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवला आहे. त्या संदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. औरंगाबाद शहरात सातत्याने उद्योजकांवर होणारे हल्ले ही एक गंभीर बाब आहे. सरकारने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमेटिव्ह प्रा. लि कंपनीत १०-१५ गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या गुंडांनी कंपनीच्या आवारात शिरून सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली होती. नित्यानंद भोगले हे निर्लेप कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांचे बंधु आहेत.

तर १० ऑगस्ट रोजी वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या गणेश कटिंग समूहावर हल्ला करण्यात आला होता. लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी हा हल्ला झाला होता. या घटना घडल्या नंतर महाराष्ट्र्रातील उद्योजकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चिंता वक्त केली आहे.

हे ही वाचा:

स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल

खादी व ग्रामोद्योग लेहमध्ये फुलवणार हिरवळ

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक

या पत्रात फडणवीसांनी उद्योजकांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. पेट्रोल भरून पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवून त्याचे पैसे न देणे, वाहन दुरुस्त झाल्यावर त्याचे पैसे न देणे हे असले प्रकार घडताना दिसत आहे आणि गेल्या आठ ते दहा महिन्यात हे प्रकार वाढले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांत तक्रारी झाल्या तरी गुन्हे दाखल करताना अगदी सामान्य कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात असे फडणवीसांनी म्हटले आहे.

तर हे असेच सुरु राहिले तर राज्यातील गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील गुंतवणुकीवर आणि रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ नये यासाठी या अशा घटनांकडे गांभीर्याने पाहायची गरज आहे असे फडणवी नमूद करतात. तर ह्या प्रकरणांमध्ये कठोर कलमे लावून खटले दाखल करण्यात यावे जेणेकरून दोषींना कडक शिक्षा होईल आणि हे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा