27 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरदेश दुनियाबिहारमधील १६ जिल्ह्यांना पुराचा फटका

बिहारमधील १६ जिल्ह्यांना पुराचा फटका

Google News Follow

Related

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती उत्तर भारतातील एका राज्यात ओढावली आहे.

बिहारमध्ये नदीची पाणीपातळी वाढल्याने सुमारे पाच लाख लोकांना फटका बसला आहे. त्याबरोबरच काल पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १५ वरून १६ वर पोचली. पूर्णियातील काही विभागात पूर आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बिहार सरकारने मदतकार्य वेगाने राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने अर्थसहाय्य म्हणून प्रत्येक कुटुंबाला सहा हजार रुपये मदत दिली जात आहे. यानुसार मंगळवारपर्यंत २३ हजार ८९९ कुटुंबांना आर्थिक मदत केली असून यानुसार १३४.३४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. आपत्तीव्यवस्थापन विभाग पूरग्रस्त जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

प्रमुख नद्यांच्या पातळीवर जलसंपदा विभागाचे अभियंते सतत लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले. पूरग्रस्त भागात अत्यावश्‍यक वस्तू, साहित्याचा पुरवठा केला जात आहे. यासाठी २५८५ नौकांची मदत घेतली जात आहे. गरजेनुसार नौकांची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. या भागात ६८ मदत छावण्या आणि ६२१ सामूहिक स्वयंपाकघर सुरू केले आहेत. या ठिकाणी काल ६ लाख २८ हजाराहून अधिक नागरिकांनी भोजन केल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत दोन लाख २२ हजार ८९९ पॉलिथिन चादर आणि १ लाख ४ हजार ५५ रेशनची पाकिटे देण्यात आली. पावसामुळे नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

झोमॅटोच्या आयपीओनंतर गुंतवणूकदारांना हा नवा पर्याय

तिसऱ्या अपत्यामुळे आली आपत्ती; कर्मचाऱ्याला बसला झटका

अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक

प्रवाशांनो! तुमचे सामान रेल्वेकडे अधिक सुरक्षित

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाचा हवाई पहाणी दौरा केला. याबाबत एएनआयने बातमी दिली होती.

बिहारचे १६ जिल्हे पूरग्रस्त

बिहारमध्ये विविध जिल्ह्यांत पूर आलेला आहे. यामध्ये पाटण्याशिवाय वैशाली, भोजपूर, लखीसराय, मुजफ्फरपूर, दरभंगा, खगडिया, सहरसा, भागलपूर, सारण, बक्सर, बेगुसराय, कटिहार, मुंगेर, समस्तीपूर, पूर्णिया जिल्ह्यातील बहुतांश भाग पूरग्रस्त झाला आहे.

उत्तर प्रदेशात २४ जिल्ह्यांना फटका

उत्तर प्रदेशात चोवीस जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गंगा, यमुनासह अनेक नद्यांची पातळी वाढलेलीच आहे. प्रयागराज येथे गंगा आणि यमुना दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढलेली असल्याने नदीकाठचा भाग पाण्याखाली गेला आहे. शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत. वाराणसीतही गंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. पाणी पातळी वाढल्यानंतर गंगा नदी वाराणसी शहरात वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करत आहे. वाराणसीत गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा