25 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरदेश दुनियाअफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यास सुरूवात

अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यास सुरूवात

Google News Follow

Related

अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे तिथे अराजक माजले आहे. त्यामुळे अनेक देशांनी त्यांचे दुतावास रिकामे केले आहेत. भारताने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना देशात परत आणायला सुरूवात केली आहे.

तालिबानचा वाढता धोका लक्षात अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 हे विमान दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना काबुलहून पुन्हा भारतात आणले जात आहे. इतर भारतीयांनादेखील लवकरच मायदेशी आणले जाणार आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर

भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!

भारतीय गोलंदाज लॉर्ड्स ऑफ क्रिकेट; भारताने इंग्लंडला नमविले

कबुल विमानतळावरून भारतीय हवाई दलाच्या विमानाने मंगळवारी सकाळी दिल्लीसाठी उड्डाण केले. या विमानामध्ये १२० जण आहेत. यामध्ये काही आटीबीपीचे जवान आणि काही माध्यमांचे प्रतिनिधीदेखील आहेत.

अफगाणिस्तामध्ये अडकलेले भारतीय नागरीक लवकरच मायदेशी परतणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मायदेशी परतण्याच्या तयारीत असलेले भारतीय सुरक्षित ठिकाणी असल्याचे ‘एएनआय’ने म्हटले आहे.

दरम्यान, तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर रात्रीच्या सुमारास काबुलमधील जवळपास सर्वच भागाचा ताबा घेतला. तालिबान राजवटीच्या भीतीने हजारो नागरिकांनी पलायन करण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केली होती. विमानतळावर कोणत्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता. सोमवारीदेखील गोंधळ दिसून आला. इतर देशांमध्ये जाण्यासाठी अफगाण नागरिकांची धडपड सुरू होती. सोमवारी, विमानतळावरील जमावाला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा