25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषहुश्श...पुजारा, रहाणेला सूर गवसला

हुश्श…पुजारा, रहाणेला सूर गवसला

Google News Follow

Related

लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सुरु असलेला कसोटी सामना फारच रंगतदार वळणावर आला आहे. रविवार, १५ ऑगस्ट रोजी या सामान्यचा भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंडने दिलेल्या अवघ्या २७ धावांच्या आघाडीचा पाठलाग करून त्यांना विजयी लक्ष्य देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला.

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे दोघे सलामीवीर खेळण्यासाठी मैदानात आले खरे, पण पहिल्या डावात अफलातून कामगिरी करणाऱ्या या दोघांनाही दुसऱ्या डावात मात्र अपयश आलेले दिसले. राहुल हा अवघ्या पाच धावा करून माघारी परतला. तर लयीत आलेला रोहित शर्मा पूल शॉटवर आपला झेल देऊन बसला. पुढे कर्णधार विराट कोहली याला देखील फार काही करता आले नाही.

हे ही वाचा:

आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान

पवनदीप झाला इंडियन आयडल

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अशा परिस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी शंभर धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पुजाराने २०६ चेंडूत ४५ धावा केल्या. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने १४६ चेंडूत ६१ धावा करत अर्धशतकी खेळी केली. ते दोघेही बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे दोघे मैदानावर उतरले. त्यापैकी रवींद्र जडेजा स्वस्तात माघारी परतला असून ऋषभ पंत आत्ताही मैदानावर टिकून आहे.

सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने धावफलकावर १८१ धावा चढवल्या असून आपले ६ गडी बाद झाले आहेत. तर आपण इंग्लंड संघाच्या विरोधात १५४ धावांची आघाडी घेतली आहे. उद्या म्हणजेच सोमवार १६ ऑगस्ट रोजी सामन्याचा अखेरचा दिवस असून या सामन्याचा निकाल नेमका काय लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा