31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषनवी मुंबईतील विमानतळाचे काम सध्या सुरू, पण...

नवी मुंबईतील विमानतळाचे काम सध्या सुरू, पण…

Google News Follow

Related

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या मागणीचा आग्रह धरण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांच्या भावना त्यांच्या कानी घातल्या.

यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानुसार १६ ऑगस्टपासून होणारे विमानतळाचे “काम बंद आंदोलन” तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पनवेल शहरातील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिका उपमहापौर जगदीश गायकवाड, जे. डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दिपक पाटील, मनोहर पाटील, आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.

सदर परिस्थिती लक्षात घेता व १३ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बरोबर कृती समितीची बैठक झाली या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आणि प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना कानी घालण्यात आल्या. केंद्रीय मंत्र्यांनीही या भावनेचा आदर केला. परंतु विमानतळाचे काम पूर्ण होणे हे ही प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. केंद्रातील मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा सन्मान ठेवून १६ ऑगस्ट पासून कृती समितीने पुकारलेले काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे., अशी घोषणा कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

हे ही वाचा:

सुधारित वाहन कायद्याचा गिअर टाका!

राज्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न

अकरावीच्या मुलांचा छळ संपलेला नाही?

मुंबई उच्च न्यायालयाची १५९ वर्षे

मात्र राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास भूमिपुत्रांचे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाच्या निमित्ताने रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्हयात अनेक प्रश्न समोर आले आहेत. हे प्रश्न एकत्रितरित्या सोडविण्यासाठी पावसाळ्यानंतर ‘भुमीपुत्र परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा