30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामालाचखोर वैशाली झनकर पोलिस कोठडीतच

लाचखोर वैशाली झनकर पोलिस कोठडीतच

Google News Follow

Related

लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केलेल्या झनकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. झनकर यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढ केलेली आहे. दोन दिवसांच्या फरार नाट्यानंतर त्यांना पोलीसांनी पकडले होते. शाळांच्या अनुदान प्रस्तावाचा कार्यादेश काढण्यासाठी आठ लाख रुपये स्विकारणाऱ्या जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

यामध्ये कल्याण येथे दोन आणि नाशिक शहरात दोन अशा एकूण चार सदनिका, कल्याण तसेच सिन्नर येथे सुमारे तीन एकर जमीन, होंडा सिटीसारखी अलिशान कार आदींचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने मंगळवारी येथे आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वीर-झनकर यांच्यासह त्यांच्या शासकीय वाहनाचा चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना ताब्यात घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांना अंधार पडल्यावर अटक करता येत नसल्याने झनकर यांना अटक न करता समन्स बजावत सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याविषयी सांगण्यात आले होते. परंतु त्या गायब झाल्या होत्या.

हे ही वाचा:

खड्ड्यांमुळे वाहतुकीची आणि पोलिसांचीही कोंडी

अहमदाबादमध्ये उभा राहणार टाटा मोटर्सचा स्क्रॅपेज कारखाना

मल्लखांबला आस ऑलिम्पिकमध्ये समावेश मिळण्याची

विग नापसंत झाल्यामुळे डोके फिरले; द्यावे लागले दीड लाख

प्रकरणातील अन्य दोन संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांकडील बेहिशेबी मालमत्तेचा शोध सुरू केला असून, फरार डॉ. झनकर यांच्या घराची झडती घेतली गेली. यावेळी विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि ४० हजार रुपयांची रोकड आढळली. यात डॉ. झनकर यांच्या नांवावर गंगापूररोड आणि शिवाजीनगर तसेच कल्याण रस्त्यावरील मुरबाड येथे आणि मौजे कंधारे येथे प्रत्येकी एक अशा एकूण चार सदनिका असल्याचे उघड झाले. याशिवाय सिन्नर तसेच कल्याणमध्ये काही गुंठे जमीन नावावर आहे. सर्व मिळून जवळपास तीन एकर जमीन त्यांच्या नावावर असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. होंडा सिटी कार, अ‍ॅक्टिव्हा आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेत त्यांची खाती आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा