मुंबई-पुणे मार्गावर लोकप्रिय असलेल्या दक्खनच्या राणीचा थाट वाढणार आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून भोर घाटाचे सौंदर्य अधिक चांगल्या नजरेने टिपता येणार आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून प्रवाशांना ही खास भेट देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने आजपासून दक्खनच्या राणीला विस्टाडोम डबा लावला आहे. त्यामुळे मुंबई- पुणे मार्गावरील भोर घाटाच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद प्रवासी अधिच उत्तम प्रकारे घेऊ शकणार आहेत. विस्टाडोम डब्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या काचा, विविध अंशात फिरणाऱ्या खुर्च्या अशा प्रकारच्या सुविधा दिलेल्या असतात. मोठ्या आकाराच्या काचांबरोबरच या डब्याचा छतावर आणि मागच्या बाजूसही काचा बसवलेल्या असतात. त्यामुळे बाहेरील दृश्यांचा आनंद प्रवाशांना अधिक प्रमाणात घेता येतो.
हे ही वाचा:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाण्याचा धोका वाढला
‘वंदे भारत’ गाड्यांबाबत मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
यापूर्वी मध्य रेल्वेने या मार्गावर डेक्कन एक्सप्रेस या गाडीला विस्टाडोम डबे दिले होते. त्या डब्यांना चांगली लोकप्रियता लाभली. त्याबरोबरच या मार्गासोबत कोकण रेल्वेवरील जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीला देखील विस्टाडोम डबे जोडण्यात आले आहेत.
मुंबई ते पुणे या मार्गावर डेक्कन क्वीन अतिशय लोकप्रिय गाडी आहे. ०२१२३/०२१२४ या क्रमांकाने धावणारी ही गाडी या दोन शहरांमधील अंतर साधारणपणे ३ तासात कापते. ही गाडी १९३० सालापासून या मार्गावर धावत आहे. तेव्हापासून या गाडीने विविध स्थित्यंतरे पाहिली आहेत.