पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगावन होण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०२२ पर्यंत पश्चिम रेल्वेच्या ९५ टक्के रेल्वे गाड्यांना जर्मन बनावटीचे डबे जोडण्याचा मानस आहे. सध्या धावत असलेल्या १७ गाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात ११ गाड्यांचे डबे बदलण्यात येतील आणि दुसऱ्या टप्प्यात सहा गाड्यांचे डबे बदलण्यात येतील.
सध्या इंटेग्रल कोच फॅक्टरीचे (आयसीएफ) डबे वापरले जातात, पण लिंक होफमन बुश (एलएचबी) हे जर्मन बनावटीचे डबे जास्त सुरक्षित आणि वजनाला हलके आहेत. एलएचबीच्या डब्यांची क्षमता आणि आयुष्यही जास्त आहे. अपघात झाल्यास हे डबे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सोयीचे आहेत. प्रत्येक डब्यात आधुनिक ब्रेक सिस्टीम असून रेल्वे वेगात असताना आपत्कालीन परिस्थितीत गाडी अचानक थांबवण्याची वेळ आल्यास ही ब्रेक सिस्टीम उपयोगी पडणार आहे.
हे ही वाचा:
संजय राठोड अजून मोकाट कसा फिरतोय?
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
औद्योगिक क्षेत्राची घोडदौड सुरू
मुंबई ते दिल्ली धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्याचाही विचार चालू आहे. प्रतितास १६० किलोमीटर वेगाने धावल्यास राजधानी १५.५ तासाचा प्रवास १२ तासात पूर्ण करू शकते, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसाल यांनी सांगितले.